मुंबईत बंगाली पूजेचा उत्साह, मांटुग्यात 9 ते 12 ऑक्टोबरपर्यंत सोहळा रंगणार
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गणेशोत्सवाचा सण असतो त्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये दुर्गा महोत्सवाचे आयोजन केले जाते. मुंबईतही मोठ्या उत्साहाने दुर्गा पूजेचा सण साजरा केला जातो. यंदा मांटुग्यातील एसएनडीटी हॉलमध्ये ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्यावतीने दुर्गा पूजेचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला मुंबईतील बंगाली बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत त्यात सहभाग घेतला होता. काय आहेत या सोहळ्याची वैशिष्ट्ये पाहूयात...
1 / 7
मुंबईतील बंगाली बांधव मुंबईत एकत्र येऊन दरवर्षी दुर्गा पूजा साजरी करीत असतात. दादर शिवाजी पार्क, माटुंगा, डोंबिवली अशा ठिकाणी दुर्गा पूजा साजरी केली जाते. यंदा माटुंगा येथील एसएनडीटी हॉलमध्ये दुर्गा पूजा उत्सवाचे आयोजन केले होते.
2 / 7
आपल्या महाराष्ट्रात घटस्थापना आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला झाली. परंतू बंगाली लोक शारदीय नवरात्री सहाव्या दिवशी म्हणजे अश्विन शुक्ल षष्ठी तिथि (महा षष्ठी) दुर्गा पूजा सुरु करत असतात. या सोहळ्यात इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांचे व्याख्यान झाले.
3 / 7
माटुंगा येथील दुर्गा पूजेचे आयोजन ठाकूर दालान आणि होईचोई आनंदो फाऊंडेशन यांच्यावतीने करण्यात आले होते. या दुर्गा पूजेला मुंबईतील बंगाली बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहीले होते.
4 / 7
एसएनडीटी हॉल येथील दुर्गा पूजा महोत्सवाला पहिल्या दिवशी बुधवारी इस्कॉनचे इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांच्या भगवतगीतेवरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्याना मोठ्या संख्येने बंगाली बांधव हजर राहीले होते.
5 / 7
मानवाच्या गरजा कधीच संपत नाहीत, प्रत्येकाला नंबर वन व्हायचे आहे. माणसाच्या अपेक्षा आणि प्रत्यक्षात त्याला मिळणारे जीवन यात अंतर असल्याने माणसाला नैराश्याने घेरले आहे.त्यामुळे एकवेळ हेल्पलेस असले तरी चालेल पण होपलेस होऊ नये असे आवाहन इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांनी यावेळी केले.
6 / 7
आपल्या हृदयाचे मंदिर झाले पाहीजे. घरात सुख आणि शांती नांदण्यासाठी देवाचे नाव, कथा आणि प्रसादाचे वितरण झाले पाहीजे. तरच घर मंदिर होईल आणि मनाला समाधान मिळेल असेही इस्कॉनचे गौरंग दास प्रभुजी यांनी यावेळी सांगितले.
7 / 7
माणसाने अहंकाराला त्यागले पाहीजे तर त्याचा उत्कर्ष होईल आणि जगात शांती नांदेल असेही गौरंग दास प्रभुजी यांनी यावेळी सांगितले. यावेळी होईचोई आनंदो फाऊंडेशनचे अध्यक्ष सुजीत यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी संस्थेचे संदीपान घोष आणि टीव्ही 9 भारतवर्षेचे व्हाईस प्रेसिडेंट डिस्ट्रीब्युशन धीरेंदर सिंग उपस्थित होते.