या भाज्यांचे सालासकट सेवन करणे ठरते खूप फायदेशीर
भाज्या खाणे आपल्या शरीरासाठी नेहमीच फायदेशीर असते. पण केवळ त्याचे सेवन करणेच महत्वाचे नव्हे तर त्या कशा पद्धतीने खातो, यावरही त्याचे फायदे अवलंबून असतात. काही भाज्या सालं न काढता खाल्ल्याने अधिक लाभदायक ठरतात.
1 / 7
2 / 7
शलगममध्ये भरपूर पोषक तत्वं असतात. यामध्ये असलेले फायबर शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. शलगम सोलल्यानंतर खाल्ल्याने अनेक पोषक तत्त्वे मिळत नाहीत, त्यामुळे न सोलताच खावे, असे तज्ज्ञ सांगतात.
3 / 7
बीटामध्ये पोटॅशिअम, लोह आणि व्हिटॅमिन सी सारखे पोषक घटक आढळतात. पण जर तुम्ही त्याचे साल काढले तर अर्ध्याहून अधिक पोषक तत्वे नष्ट होतात. अशावेळी तुम्ही पुढच्या वेळी बीटाचे सेवन कराल तेव्हा ते पूर्णपणे स्वच्छ धूवून घ्या पण ते न सोलता खा.
4 / 7
मुळ्याची सालं काढून खाल्ल्याने शरीराला तितका फायदा होत नाही जितका त्याच्या सालांसकट खाल्ल्याने होतो. यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात ज्यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात.
5 / 7
बटाट्याच्या सालामध्येही असे अनेक पोषक घटक असतात, जे पोट आणि हृदय निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात. त्यामुळेच बटाट्याचे सालासकटच सेवन करावे.
6 / 7
भोपळा त्याच्या सालासह खाल्ल्यास त्यापासून भरपूर पोटॅशिअम आणि लोह मिळते. ही दोन्ही पोषक तत्वं शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. हृदय निरोगी ठेवण्यासाठी ते खूप मोठी भूमिका बजावते.
7 / 7
काकडी सोलून खाल्लाने सालांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट नष्ट होतात, त्याच्या सालांमध्ये भरपूर एंजाइम आढळतात. अशा परिस्थितीत काकडी सोलून खाऊ नका. ती नेहमी सालासकटच खावी.