पपई - अँटी-ऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध असलेली पपई त्वचेसाठी वरदान आहे. याच्या मदतीने अँटी-एजिंगसारख्या समस्यांवर मात करता येते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी, के, ई, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस देखील असतात. त्यात पॅपेन नावाचे एंजाइम असते जे नैसर्गिक अंटी-इन्फ्लेमेटरी एजंट म्हणून कार्य करते. तुम्ही पपई खाऊ शकता आणि त्याचा फेस मास्क म्हणूनही वापर करू शकता.