Photos : नाशिकच्या आदिवासी भागात शिक्षणासाठी शिक्षकांचा पुढाकार, गावकऱ्यांच्या मदतीने अनोखी शाळा
नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या जांभुळपाडाच्या शिक्षकांनी गरीब मुलांच्या पारड्यात काहीतरी ज्ञानदान टाकावं या मनोमन भावनेने प्रयत्न केले.
-
-
कोरोनाचे संकट आल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थ्यांना कसं शिकवावं हा प्रश्न उभा राहिला.
-
-
राज्यात अनेक ठिकाणी गावांमध्ये कुठल्याही प्रकारची रेंज/नेटवर्क नसल्याची स्थिती आहे. तसेच शाळा भरवण्यासही शासनाची परवानगी नव्हती.
-
-
अशीच परिस्थिती नाशिकमधील त्र्यंबकेश्वरच्या जांभुळपाडा येथेही होती. मात्र, तेथील शिक्षकांनी गरीब मुलांच्या पारड्यात काहीतरी ज्ञानदान टाकावं या मनोमन भावनेने प्रयत्न केले.
-
-
त्यांनी गावकऱ्यांशी बोलून गावकीच्या सभामंडपात शाळा भरवण्यास सुरुवात केली.
-
-
यावेळी कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली.
-
-
वेळप्रसंगी कधी घराच्या ओट्यावर, तर कधी झाडाखाली वर्ग भरवण्यात आले.
-
-
अशाप्रकारे या शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने ज्ञानदानाचं हे पवित्र काम पूर्ण केलं.
-
-
याचा या गावातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा झाला. त्याचं या शिक्षकांनाही मनोमन समाधान वाटत असल्याची भावना ते व्यक्त करतात.