Marathi News Photo gallery Eknath Shinde: This rebellion for Balasaheb, for Hindutva; Eknathi plays a central role in the media
Eknath Shinde : बाळासाहेबांसाठी, हिंदुत्वासाठी हे बंड ; एकनाथ शिंदेनी माध्यमांच्यासमोर मांडली भूमिका
ज्या उद्देशाने शिवसेनेतील नाराज आमदारांनी हा निर्णय घेतला आहे, त्यावर आजही बंडखोर आमदार हे ठाम आहेत. शिवाय यामधील एकही आमदार नाराज किंवा परत येण्याच्या मनस्थितीमध्ये नाही.
1 / 5
शिवसेना नेते एकनाथ शिंदे व इतर आमदारांनी केलेली बंडखोरीमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. सद्यस्थितीला एकनाथ शिंदे आमदारांच्या सह गुहावटी येथे वास्तव्यास आहे. गुहावटीत वास्तव्यास असल्यापासून एकनाथ शिंदे यांनी प्रथमच माध्यमांच्या सोबत संवाद साधत आपली भूमिकास्पष्ट केली आहे.
2 / 5
बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर आजही आपण ठाम असल्याचे एकनाथ शिंदे यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे. बंड केले असले तरी अजून सर्वजण हे शिवसेनेमध्येच आहोत आणि शिवसेनेलाच पुढे घेऊन जाण्यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे बंडाच्या पहिल्या दिवशीपासून ज्य उद्देशाने शिंदे गटाने हा निर्णय घेतला त्यावर ते आजही ठाम आहेत.
3 / 5
एकनाथ शिंदे गटाची भूमिका हे अधिकृतपणे दीपक केसरकर मांडत असल्याची आठवण करुन देत त्यांनी अजूनही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा असेच सांगितले आहे.
4 / 5
ज्या उद्देशाने शिवसेनेतील नाराज आमदारांनी हा निर्णय घेतला आहे त्यावर आजही बंडखोर आमदार हे ठाम आहेत. शिवाय यामधील एकही आमदार नाराज किंवा परत येण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
5 / 5
इथे 50 लोक आहेत. ते स्वेच्छेने आले आहेत आणि आनंदी आहेत. लोक आपल्या संपर्कात असल्याचा दावा करणाऱ्यांनी नावे जाहीर करावीत. ते फक्त दिशाभूल करण्याचा आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत असे स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे