Marathi News Photo gallery Electric lighting to chhatrapati shivaji maharaj terminus building on the occasion of indian railways birthday
PHOTO : भारतीय रेल्वेचा वाढदिवस! विद्यूत रोषणाईने उजळली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक वास्तू
भारतीय रेल्वेचा शुक्रवारी वाढदिवस आहे. 16 एप्रिल 1953 रोजी भारतीय रेल्वेचा उदय झाला होता. त्यानिमितीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या इमारतीला विद्यूत रोषणाई करण्यात आलीय.
1 / 5
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील प्रमुख केंद्र, ज्या ठिकाणी रोज लाखो लोक भेट देतात, ज्या ठिकाणाहून संपूर्ण देश जोडला गेलेला आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची ऐतिहासिक वास्तू गुरुवारी विद्यूत रोषणाईने उजळून निघाली. निमित्त होतं भारतीय रेल्वेच्या वाढदिवसाचं.
2 / 5
तब्बल 67 हजार 415 किलोमीटरचं जाळं असलेल्या भारतीय रेल्वेचा आज वाढदिवस आहे. 16 एप्रिल 1953 रोजी भारतीय रेल्वेचा उदय झाला होता. त्यानिमित्त भारतीय रेल्वेच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या ऐतिहासिक वास्तूला आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली.
3 / 5
या वास्तूला नुकताच ग्रीन स्टेशनचा बहुमान मिळाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं पूर्वीचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. हे स्थानक मुंबई शहरातील एक ऐतिहासिक आणि सर्वात मोठं रेल्वे स्थानक आहे.
4 / 5
हे रेल्वे स्थानक 1887 मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आलं होतं. या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकारानं केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी 16 लाख 14 हजार रुपयांचं मानधन देण्यातं आलं होतं.
5 / 5
मार्च 1996 पर्यंत या स्थानकाचं नाव व्हिक्टोरिया टर्मिनस असं होतं. नंतर या स्थानकाचं नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस असं करण्यात आलं. त्यानंतर 2017 मध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द जोडण्यात आला.