PHOTO | कोरोनामुळे स्थगित झालेली कसोटी मालिका खेळण्यासाठी इंग्लंड श्रीलंकेत दाखल
कोरोनामुळे श्रीलंका विरुद्ध इंग्लडं कसोटी मालिका कोरोनामुळे स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे आता नववर्षात ही मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 2 कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे.
1 / 4
कसोटी मालिकेसाठी इंग्लंड क्रिकेट टीम दुसऱ्यांदा श्रीलंकेत दाखल झाली आहे. या दौऱ्यावर इंग्लंड श्रीलंकेविरोधात 2 कसोटी सामने खेळणार आहे. ही मालिका मार्च 2020 महिन्यात खेळणं अपेक्षित होतं. त्यासाठी इंग्लंड श्रीलंकेत पोहचली होती. मात्र कोरोनाचे अनेक रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत होते. त्यामुळे खबरदारी म्हणून कसोटी मालिका स्थगित करण्यात आली होती. इंग्लंडचा संघ सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच मायदेशी परतला.
2 / 4
इंग्लडं टीम ब्रिटिश एअरवेजच्या चार्टड फ्लाईटने रविवारी राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचली. सध्या श्रीलंका-युके विमानसेवा बंद आहे. मात्र इंग्लंड संघाला श्रीलंकेत येण्यासाठी विशेष परवानगी देण्यात आली.
3 / 4
विमानतळावर पोहचताच खबरदारीचा उपाय म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंचे कपडे, क्रिकेट कीट आणि इतर वस्तु सॅनिटाईज करण्यात आल्या. तसेच रॅपिड अॅंटिजेन टेस्टही केली गेली. सर्व सोपस्कार पार पाडल्यानंतर इंग्लंडचे खेळाडू हॉटेलमध्ये थांबले आहेत.
4 / 4
क्वारंटाईन कालावधीनंतर या दोन्ही संघांमध्ये सराव सामने खेळण्यात येणार आहे. या सराव सामन्यात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी नसणार आहे. यानंतर 14-18 जानेवारीला पहिला तर 26-30 जानेवारीला दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे.