Skin Care Tips: त्वचेसाठी उत्तम ठरते निलगिरी तेल
त्वचेची काळजी घेण्यासाठी निलगिरी तेलाचा वापर करण्याचा सल्ला त्वचारोगतज्ज्ञही देतात. हे एक प्रकारचे इसेंशिअल ऑईल असून गेल्या काही वर्षात त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्याचे दुष्परिणाम कमी आणि त्वचेला होणारे फायदे जास्त आहेत.
1 / 5
त्वचेची काळजी घेण्यासाठी निलगिरी तेलाचा वापर केला जातो. हे तेल निलगिरीच्या झाडापासून तयार केले जाते. हे एक प्रकारचे इसेंशिअल ऑईल असून गेल्या काही वर्षात त्याची लोकप्रियता खूप वाढली आहे. त्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-ऑक्सीडेंट गुणधर्म असतात. त्याचे फायदे जाणून घेऊया.
2 / 5
सनबर्न दूर करते : या तेलामध्ये त्वचेवरील सनबर्न दूर करण्याचे गुणधर्म आहेत. या तेलाचा रोज योग्य प्रकारे वापर केल्यास काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.
3 / 5
त्वचा ठेवते मॉयश्चराइज्ड : निलगिरीच्या तेलामध्ये त्वचेला मॉइश्चराइज्ड ठेवण्याची गुणवत्ताही आहे. त्वचा कोरडी झाली की अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तुम्ही त्वचेवर निलगिरीचे तेल लावू शकता. हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना याचा वापर उत्तम ठरतो.
4 / 5
जखम लवकर भरते : निलगिरीच्या तेलाचा आणखी एक फायदा म्हणजे त्याच्या वापराने त्वचेवरील छोट्या-मोठ्या जखमा लवकर भरल्या जातात. कारण या तेलमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. जिथे जखम झाली असेल तिथे निलिगरीचे तेल दिवसातून 2-3 वेळा लावावे.
5 / 5
तेल असे लावावे : हे एक इसेंशिअल ऑईल म्हणून ते लावण्याची योग्य पद्धतही जाणून घेणे आवश्यक आहे. ते थेट त्वचेवर लावण्याऐवजी रोज वापरल्या जाणाऱ्या तेलात घालावे. नियमित वापरायच्या तेलात निलगिरी तेलाचे अवघे काही थेंब घालावे व ते वापरावे.