फक्त एवढे दिवस करा चेहऱ्याला बर्फाने मसाज, मिळतील अनोखे फायदे
गेल्या काही दिवसांपासून त्वचेसाठी बर्फ वापरण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. ही ट्रिक फक्त चेहऱ्यासाठीच नव्हे तर अंघोळीसाठीही फेमस आहे. रकुल प्रीत सिंग आणि वरुण धवन यांसारखे सेलिब्रिटीही आईस बाथ घेतात. पण चेहऱ्याला बर्फाने मसाज केल्यावर काय फायदे मिळतात माहीत आहेत का ?
1 / 5
सध्या आइस बाथचा ट्रेंड चालू आहे. रकुल प्रीत सिंगसह अनेक स्टार्सही तो ट्रेंड फॉलो करतात. आईस बाथप्रमाणेच चेहऱ्याला बर्फाचा मसाज करणेही फायदेशीर ठरू शकते. 15 दिवस फेस आयसिंग केल्यास कोणते फायदे मिळतात ते समजून घेऊया.
2 / 5
रक्ताभिसरण सुधारते : तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, चेहऱ्यावर नियमितपणे बर्फ लावला तर त्यामुळे रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे आपला चेहराही चमकू लागतो.
3 / 5
जर एखाद्या व्यक्तीला चेहऱ्यावर सूज आली असेल किंवा फुगीरपणा जाणवत असेल तर अशा वेळी फेस आयसिंग रूटीन फॉलो करता येऊ शकते. बर्फामुळे रक्तवाहिन्यांमधील सूज कमी होण्यास मदत मिळते.
4 / 5
चेहऱ्यावर मिनिटभर बर्फाने मसाज केला तर त्यामुळेही फ्रेश वाटू शकते. स्किन फ्रेश दिसावी म्हणून तुम्ही स्किन केअर टिप फॉलो करू शकता.
5 / 5
असे करावे फेस आयसिंग : तुम्ही बर्फ थेट चेहऱ्यावर चोळू शकता किंवा थंड पाण्याने चेहरा धुवू शकता. याशिवाय, तुम्ही पुदिना, तुळस किंवा इतर औषधी वनस्पतींचे तुकडे पाण्यात घालून ते फ्रीजरमध्ये ठेवून क्यूब्स तयार करू शकता. नंतर त्याचा चेहऱ्यासाठी वापर करता येऊ शकतो. ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)