प्रवासादरम्यान झोप लागतेय, कारण काय? संशोधन काय सांगते?
प्रवासात झोप येण्याचे कारण काय? यावर अनेक संशोधने झाली आहेत. काही संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हायवे हिप्रोसेस हे एका महत्वाचे कारण मानले जाते. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रवासाची तयारी करावी लागते. या तयारीच्या वेळी कोणतीही वस्तू राहू नये याची चिंताही सतावत असते. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही.
1 / 5
प्रवासात अनेकांना झोप लागते. मात्र असे का होत हा प्रश्न अनेकदा पडतो. प्रवासात झोप येण्याचे कारण काय? यावर अनेक संशोधने झाली आहेत. काही संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार हायवे हिप्रोसेस हे एका महत्वाचे कारण मानले जाते. प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रवासाची तयारी करावी लागते. या तयारीच्या वेळी कोणतीही वस्तू राहू नये याची चिंताही सतावत असते. त्यामुळे पुरेशी झोप होत नाही, यालाच स्लीप डेबट म्हटले जाते. त्यामुळे प्रवासात झोप लागते.
2 / 5
द कन्व्हर्सेशनच्या रिपोर्टनुसार जेव्हा आपण कारमध्ये बसलेलो असतो, तेव्हा आपण काहीच करत नसतो. त्यामुळे शरीराला व मेंदूला एक प्रकारचा निवांतपणा मिळतो . जो नियमितपणे आपल्याला झोपेच्या वेळी मिळत असतो. त्यामुळे जसे झोपेच्या वेळी आपले मन व मेंदू रिलॅक्स होतो तसाचा कारमध्ये बसल्यावरही
होतो. याबरोबरच कारमधील प्रवासादरम्यानच्या हालचालीही झोप लागण्यास एकप्रकारे कारणीभूत असतात. प्रवासादरम्यान शरीरही अगदी तसेच काम करते जसे लहानपणी आई-वडील खांद्यावर घेऊन लहान मुला झोपवण्याचे काम करतात.
3 / 5
संशोधकांच्या अहवालानुसार या हायवे हिप्रोसेस म्हटले जाते. ही गोष्ट वाहन चालकांमध्ये होत असते. विशेषत , जेव्हा तो लांब पल्ल्यासाठी वाहन चालवत असतो. अनेकदा चहा किंवा कॉफीचे सेवन करून ही समस्या दूर केली जाते. प्रवासात झोप येण्याचे आणखी तिसरं एक कारण आहे . व्हाईट नॉइज म्हून ओळखले जाते. यामध्ये लोकांचा गोंधळ , हवेचा आवाज, वाहनाचा आवाज यामुळे निर्माण होत असतो.
4 / 5
संशोधकाचे अद्यापही संशोधन सुरु आहे, की एवढ्या गोंगाटात नागरिकांना झोप कशी लागू शकते. काही संशोधकांच्या मते लहानपणी मुलांना झोपवताना अनेकदा आई-वडील वेगवेगळ्याप्रकारचे आवाज काढत राहतात. त्यामुळे मुलांना झोप लागते. मात्र प्रवासात झोप कशामुळे लागते, हेअद्याप समजू शकले नाही.
5 / 5
संशोधकांच्या म्हणण्यानुसार लांबपल्ल्याच्या प्रवासात झोप येणे साहजिक आहे. मात्र अगदी 10-15 मिनिटाच्या प्रवासात कुणाला झोप येत असेलतर त्या व्यक्तीला सोपाईट सिंड्रोमची समस्या असण्याची शक्यता आहे. ही एकान्यूनोरोजीकल डिसऑर्डर आहे ज्यामध्ये व्यक्तीला थकल्यासारखे वाटते.