PHOTO | ऑल इंडिया रेडिओ ते आज तकचा राईटीस्ट आवाज कोरोनाने हिरावला, जाणून घ्या रोहित सरदानांच्या आयुष्याबद्दल
सध्या रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवर अँकर म्हणून कार्यरत होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.
1 / 10
रोहित सरदाना (Rohit Sardana) हे भारतातील सर्वात आवडते, दमदार आवाजाचे अँकर होते. रोहित यांनी दीड दशकांच्या कारकीर्दीत सर्वप्रथम ऑल इंडिया रेडिओमध्ये उद्घोषक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.
2 / 10
त्यानंतर ईटीव्ही, सहारा आणि झी न्यूजमध्ये आपल्या भारदस्त आवाजात अँकरिंग करत त्यांनी भारताच्या कानाकोपऱ्यात आपले नाव पोहचवले.
3 / 10
रोहित सरदाना अशा काही अँकरमध्ये गणले जातात, ज्यांचे प्रश्न इतके सरळ आणि मुद्देसूद असतात की बर्याच वेळा चर्चेत सहभागी झालेल्या पाहुण्यांनाही घाम फुटायचा.
4 / 10
त्यांच्या वक्तव्यांमुळे बातमीचे मथळे तयार व्हायचे आणि सोशल मीडियावर खळबळ उडायची. लाखो लोक त्यांच्या ट्वीटची प्रतीक्षा करत असायचे. तर, त्याचे ट्विट हजारोवेळा रीट्वीट केली जायची.
5 / 10
रोहित यांच्या अनेक स्टोरी देशातील बातम्यांचा अजेंडा ठरवणाऱ्या ठरल्या. ज्यामध्ये जेएनयूमधील देशविरोधी घोषणा, काश्मीरमधील हुर्रियत नेत्यांचे पाकिस्तानशी निधि कनेक्शन, पं. बंगाल आणि धुलागढ मधील जातीय हिंसाचार, कैरानाच्या निर्वासनाचे सत्य आणि तिहेरी तालक विरोधात सामाजिक चळवळीची सुरुवात असह अनेक स्टोरी त्यांनी केल्या होत्या.
6 / 10
2014 मध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी खासदारांचा ‘लेखाजोखा’ हा कार्यक्रम केला, जो एक मैलाचा दगड ठरला.
7 / 10
सर्वसाधारण निवडणुका असो वा प्रत्येक राज्यातल्या निवडणुका, स्पष्ट व अचूक अहवाल देऊन लोकांची मते जाणून घेतली.
8 / 10
हरियाणातील हिसारमधून पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या रोहित यांच्या नावावर बेस्ट अँकरसह, NT Award आणि ENBA Award, तसेच हिंदी पत्रकारितेचा प्रतिष्ठित गणेश शंकर विद्यार्थी पुरस्कारही आहे.
9 / 10
सध्या रोहित सरदाना हे आज तक या हिंदी वाहिनीवर अँकर म्हणून कार्यरत होते. रोहित यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
10 / 10
त्यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.