केंद्र सरकारने केलेल्या कामगार आणि शेतकरी कायद्याविरोधात आज 'संविधान दिना'चं औचित्यसाधून हजारो कामगारांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात जोरदार आंदोलन केलं.
या आंदोलनात डहाणूतून 6000, तलासरीमधून 5500, शहापूरमधून 5000, वाडा तालुक्यातून 3500, विक्रमगड येथून 3000, जव्हारमधून 2500 आणि पालघरमधून 1500 कामगारांनी भाग घेतला.
Follow us on
केंद्र सरकारने केलेल्या कामगार आणि शेतकरी कायद्याविरोधात आज ‘संविधान दिना’चं औचित्य साधून हजारो कामगारांनी ठाणे, पालघर जिल्ह्यात जोरदार आंदोलन केलं.
ठाणे-पालघर जिल्ह्याच्या 9 तालुक्यात 27,500 हून अधिक कामगारांनी रस्त्यावर उतरून केंद्राकडून होत असलेल्या शोषणाला वाचा फोडली. कामगारांच्या या एक दिवसीय संप आणि रस्ता रोको आंदोलनाला ठाणे-पालघर जिल्ह्यात जबरदस्त प्रतिसाद मिळाला.
अखिल भारतीय किसान सभा, सीटू, जनवादी महिला संघटना, डी.वाय.एफ.आय. आणि एस.एफ.आय या सर्व जनसंघटनांनी हे आंदोलन पुकारले होते.
या आंदोलनात डहाणूतून 6000, तलासरीमधून 5500, शहापूरमधून 5000, वाडा तालुक्यातून 3500, विक्रमगड येथून 3000, जव्हारमधून 2500 आणि पालघरमधून 1500 कामगारांनी भाग घेतला.
यावेळी आंदोलकांनी डहाणू व तलासरी तालुक्यात मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर, शहापूर तालुक्यात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर, विक्रमगड व वाडा येथे प्रत्येकी तीन राज्य महामार्गांना जोडणाऱ्या मुख्य नाक्यावर, जव्हार येथे नाशिक व सेल्वासला जोडणाऱ्या दोन महामार्गसह बोईसर येथी राज्य महामार्गांवर रास्तारोको केला.
कामगारांनी तब्बल दीड ते दोन तास रास्तारोको केला. विक्रमगड तालुक्यात तर कामगारांनी तब्बल सहा तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे या ठिकाणी वाहतूकीची मोठी कोंडी झाली होती.
भिवंडी येथे सीटूच्या 400 हून अधिक कामगारांनी 1 किमी लांबीची कामगार साखळी तयार केली होती. तर कल्याण येथे सुमारे 150 कामगार आणि महिला-युवकांनी पोलिसांच्या विरोधाला न जुमानता जबरदस्त घोषणा देत तहसील कार्यालयावर मोर्चा नेला.
कामगारांच्या या आंदोलनाला गालबोट लागू नये म्हणून ठिकठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कामगारांनी अत्यंत शिस्तबद्धपणे हे आंदोलन केलं. या आंदोलनात महिलांचा सर्वाधिक समावेश होता.