Photo Gallery : ऊसतोड मजूराचं पोर फौजदार झालं, अख्ख्या गावानं त्याला डोक्यावर घेतलं, ज्ञानेश्वराच्या ज्ञानार्जानाचा प्रेरणादायी प्रवास

| Updated on: Mar 11, 2022 | 12:57 PM

बीड : हलाकीची परस्थिती शिक्षणाच्या प्रवासात कधीच अडचणीची ठरु शकत नाही. जिद्द, चिकाटी आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण बीड जिल्ह्यातील शिदोड येथील ज्ञानेश्वर देवकते याने राज्यभरातील विद्यार्थ्यांसमोर ठेवलेले आहे. बीड जिल्हा तसा ऊसतोड मजूरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, आई-वडीलांच्या नशिबाला जे ऊसतोडीचे काम आले त्याचीच परंपरा कायम राहू नये म्हणून ज्ञानेश्वर देवकते यांनी अनंत अडचणींचा समाना केला पण शिक्षणात खंड पडू दिला नाही. कुटुंबाची परस्थिती नाजूक असल्यामुळे त्याने शेजारील शेतकऱ्याच्या शेळ्या राखल्या. यातून मिळालेल्या रोजगारातून शिक्षण पूर्ण केले आणि आज तो स्पर्धा परिक्षेतून पोलीस निरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. गावकऱ्यांसाठीच नव्हे तर सबंध बीड जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून त्याचे हे यश पाहून गावकऱ्यांनी त्याची ढोल-ताशाच्या गजरात आणि गुलालाची उधळण करीत मिरवणूक काढली आहे.

1 / 5
ढोल-ताशाचा गजर अन् घोड्यावर ज्ञानेश्वर : स्पर्धा परिक्षेत यश मिळवल्यानंतर ज्ञानेश्वर हा आपल्या मूळ शिदोड गावी आला होता. अत्यंत प्रतिकूल परस्थितीमध्ये त्याने हे यश मिळवले आणि त्याचे साक्षीदर हे सबंध गाव होते. गावचा पोरगा फौजदार झाला म्हणून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि जागोजागी ज्ञानेश्वर याला औक्षण केले जात होते.

2 / 5
आई-वडील ऊसतोड मजूर : ज्ञानेश्वर दवकते यांचे आई-वडील हे ऊसतोड मजूर आहेत. एकदा का ऊसतोडीचा हंगाम सुरु झाला की ते 6 महिने गावाकडे फिरकत नाहीत. अशा प्रसंगी ज्ञानेश्वर याने शेजारील शेतकऱ्याच्या शेळ्या राखण्यासाठी घ्यायच्या आणि यातूनच मिळालेल्या रोजंनदारीतून आपले शिक्षण पूर्ण केले होते.

3 / 5
स्पर्धा परिक्षेतून मिळाले यश :  आपल्याला स्पर्धा परिक्षेशिवाय पर्याय नाही ही खूनगाठच ज्ञानेश्वर यांनी बांधलेली होती. शिवाय घरची परस्थिती हालाकीची असल्याने पुढील शिक्षणाचा खर्च न परवडणारा असल्याने त्यांनी हा मार्ग निवडला आणि तो यशस्वी ही करुन दाखवला.

4 / 5
ज्ञानेश्वरचे यश अन् गावाचा जल्लोष : कठीण परस्थितीवर मात करुन ज्ञानेश्वर यांनी हे यश मिळवल्याची जाण गावच्या प्रत्येक ग्रामस्थांना होती. ज्ञानेश्वराच्या या यशामुळे गावचे महत्व वाढले आणि शिवाय अनेक तरुणांसाठी हे यश प्रेरणादायी आहे.

5 / 5
शिदोडमध्ये दिवाळी-दसरा : यश हे ज्ञानेश्वर देवकतेचे असले तरी त्याचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याने गावकऱ्यांनी सबंध गावभर त्यांची घोड्यावरुन मिरवणूक काढली. एवढेच नाही तर चौकाचौकात औक्षण आणि शेवटी ग्रामस्थांच्या वतीन सत्कार करण्यात आला. यामध्ये सबंध गाव सहभागी झाले होते.