Photo Gallery : आगीच्या दुर्घटनेत शेतकऱ्याचा संसार उध्वस्त, शेती साहित्यही जळून खाक

| Updated on: Mar 13, 2022 | 2:39 PM

बुलडाणा : प्रतिकूल परस्थितीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट तर होतच आहे पण अधिकचा खर्चही होत आहे. हे कमी म्हणून की काय जिल्ह्यातील बोडखा येथील शेतकऱ्याच्या घराला आणि लगतच असलेल्या गोडाऊनला आग लागल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये संसारउपयोगी साहित्याची तर होळी झाली आहेच पण अधिकचा दर मिळावा म्हणून पुरुषोत्तम हागे यांनी शेतीमालाची साठवणूक केली होती. या दुर्घटनेत शेतीमालाचीही राखरांगोळी झालेली आहे. गावाला लागूनच हागे यांचे शेत आणि घर असल्याने ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र, भर दुपारी आग लागल्याने अवघ्या काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले होते. यामुळे अवघ्या काही वेळातच सर्वकाही होत्याचं नव्हतं झालं होतं.

1 / 5
आगीचे कारण अस्पष्ट : बोडखा या गावालगतच पुरुषोत्तम हागे यांचे घर आणि शेती आहे. असे असताना शनिवारी दुपारी त्यांच्या घराला आग लागली होती. मात्र, आगीचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. यामध्ये घरासह गोडाऊनच्या आगीत तब्बल 12 लाखाचे नुकसान झाले आहे.

2 / 5
शेती साहित्यही जळून खाक: पुरुषोत्तम हागे यांनी ठिबक, स्प्रिंक्लर आणि इतर शेती साहित्य हे घराला लागूनच असलेल्या गोडाऊनमध्ये ठेवले होते. या आगीत शेती साहित्याची राखरांगोळी तर झाली पण आता ही भरपाई कशी मिळवावी हा प्रश्न  आहे.

3 / 5
घर अन् गोडाऊनही उध्वस्त : या दुर्घटनेचे कारण समोर आले नसले तरी या घटनेत हागे यांचे 12 लाखाचे नुकसान तर झालेच आहे पण घर आणि गोडाऊनही उध्वस्त झाले आहे. त्यामुळे हागे यांना मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

4 / 5
धान्याची केली होती साठवणूक : शेतीमालाला योग्य दर मिळेल यामुळे हागे यांनी धान्याची साठवणूक केली होती. पण आता विक्रीपुर्वीच अशी दुर्घटना झाल्याने हागे यांचे नुकसान झाले होते. या दुर्घटनेत तब्बल 12 लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

5 / 5
ग्रामस्थांचे शर्थीचे प्रयत्न निष्फळ : गावालगत असलेल्या हागे यांच्या घराला आग लागल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. शिवाय आग विझवण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला होता. मात्र, उन्हाच्या झळा आणि वाऱ्यामुळे ही आग ग्रामस्थांना अटोक्यात आणता आलेली नाही.