टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू शिखर धवन सर्वांनाच माहिती आहे. कॅप्टन रोहित शर्मासोबत ओपनिंगला खेळायला येणार शिखर आता संघाबाहेर आहे. धवन एकदम हसून खेळून राहतो मात्र फादर्स डे ला शिखर एक बाप म्हणून इमोशनल झाला होता.
शिखर धवन याच्या आयुष्यात अनेक वादळी आलीत. मात्र गडी कधी झुकला नाही पण आतून तो खूप दु:खी असावा.
शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा यांनी घटस्फोट घेतला आहे. दोघांना जोरावर नावाचा मुलगा असून तो शिखरच्या पत्नीसोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहायला असतो.
फादर्स डे ला शिखर धवन याने पोस्ट करत त्याचं दु:ख माडलं. शिखरने केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. धवनचे चाहते त्याला गब्बर असंही बोलतात. हाच गब्बर वैयक्तिक गोष्टींमुळे खचत चालल्यासारखं दिसत आहे.
शिखर धवन याने आपल्या वडिलांसोबतचा फोटो पोस्ट केला. त्यानंतर त्याने, हा फादर्स डे माझ्यासाठी भावनिक आहे कारण मी माझ्या मुलासोबत बोलूही शकत नाहीये. माझ्या त्याच्यासोबत काही संपर्क झालेला नाही. अशाच परिस्थितीतून जे लोक जात आहेत त्यांनाही फादर्स डे च्या शुभेच्छा.