Mini Electric Car: 14 वर्षांची मुलंही चालवू शकतात ही इलेक्ट्रिक कार, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही

| Updated on: Sep 20, 2023 | 8:19 PM

Mini Electric Car: इलेक्ट्रिक गाड्यांची क्रेझ गेल्या काही दिवसांमध्ये वाढली आहे. लहान मुलांसाठीही इलेक्ट्रिक स्कूटर्स आणि सायकल लाँच झाली आहे. आता मिनी इलेक्ट्रिक कारची चर्चा रंगली आहे.

1 / 6
फियाट कंपनीने मिनी इलेक्ट्रिक कार लाँच केली आहे. ही इलेक्ट्रिक कार भारत लाँच होणाऱ्या MG Comet इव्हीपेक्षाही लहान आहे. फियाटची टोपोलिनो ही इलेक्ट्रिक कार 2.53 मीटर लांब आहे. तर एमजी कॉमेटची लांबी 2.97 मीटर आहे. (Photo- Fiat Twitter)

2 / 6
फिएट टोपोलिनो कंपनीची दुसरी इलेक्ट्रिक कार आहे. ही गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. म्हणजेच 14 वर्षांची मुलंही ही गाडी चालवू शकता. कारण ही कार हेवी क्वाड्रीसायकल सेगमेंटमध्ये ठेवली आहे. (Photo- Fiat Twitter)

3 / 6
फिएट इलेक्ट्रिक कारमध्ये 5.5 किलोवॅट लिथियम आयन बॅटरी आहे. एकदा फुल चार्ज केली की 75 किमीपर्यंत रेंज मिळते. इलेक्ट्रिक कारचा स्पीड 45 किमी प्रतितास इतका आहे. (Photo- Fiat Twitter)

4 / 6
टोपोलिनो कार वीटा ग्रीन रंगात लाँच केली आहे. यात रेट्रो स्टाईल व्हील, रुफ टॉपमध्ये रीट्रॅक्टबल कॅनव्हास आणि कोलोज्ड ग्लासचा पर्याय दिला आहे. कार दरवाजा असलेली आणि नसलेली अशा दोन गटात आहे. (Photo- Fiat Twitter)

5 / 6
गाडीत तुम्ही युएसबी फॅन, स्पीकर्स आणि दुसऱ्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. या गाडीची किंमत जवळपास 6.70 इतकी आहे. तसेच ही गाडी 48 महिन्यांच्या हप्त्यावरही खरेदी करता येईल. यासाठी प्रत्येक महिन्याला 3500 रुपये द्यावे लागतील. (Photo- Fiat Twitter)

6 / 6
फियाट कंपनीने ही कार सध्या इटलीमध्ये लाँच केली आहे. या वर्षाच्या शेवटी ही कार जर्मनी आणि फ्रान्समध्ये लाँच केली जाईल. भारतात लाँच होईल की नाही याबाबत माहिती नाही. (Photo- Fiat Twitter)