Photo : ‘8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात, राज ठाकरेंच्या हस्ते पहिली क्लॅप
VN |
Updated on: Dec 20, 2020 | 6:56 PM
'8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शनिवारी क्लॅप देण्यात आला.(Filming begins, the first clap at the hands of Raj Thackeray)
1 / 5
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते '8 दोन 75 : फक्त इच्छाशक्ती हवी!' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी शनिवारी क्लॅप देण्यात आला.
2 / 5
उत्तम स्टारकास्ट आणि महत्त्वाचा विषय असलेल्या या चित्रपटाचं चित्रीकरण पुण्यात सुरू करण्यात आलं आहे.
3 / 5
विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. तर चित्रपटाची पटकथा शर्वाणी पिल्लई आणि सुश्रुत भागवत यांनी लिहिली आहे
4 / 5
अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के अशी चित्रपटाची दमदार स्टारकास्ट असून अभिनेता पुष्कर श्रोत्री गेस्ट कलाकार असणार आहे.
5 / 5
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या मुहुर्ताचा क्लॅप देऊन चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.