Noida Supertech Twin Towers Demolition : अखेर बहुचर्चित नोएडा ट्विन टॉवर जमीनदोस्त; या फोटोंमधून समजेल इमारत कशी पाडली!
आज अडीच वाजता नोएडाचा ट्विन टॉवर पाडण्यात आला . अवघ्या नऊ ते 12 सेकंदात, 32 आणि 29 मजली इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या . यावेळी अनेक किलोमीटर अंतरावरून धुळीचे लोट निर्माण झाले
1 / 5
आज अडीच वाजता नोएडाचा ट्विन टॉवर पाडण्यात आला . अवघ्या नऊ ते 12 सेकंदात, 32 आणि 29 मजली इमारती जमीन दोस्त करण्यात आल्या . अनेक किलोमीटर अंतरावरून धुळीचे लोट निर्माण झाले आहेत. 200 कोटींहून अधिक खर्च करून बांधलेले हे टॉवर पाडण्यासाठी सुमारे 20 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचेही सांगण्यात आले आहे.
2 / 5
घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. 800 पेक्षा अधिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. इमारत पाडताना कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी इमारतीकडे जाणारे सर्व रस्ते दीड किलोमीटर अंतरावर बंद करण्यात आआला होता
3 / 5
ट्विन टॉवर पाडताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात केला होता. एनडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. एनडीआरएफ टीमसोबतच 560 पोलीस आणि राखीव दलाचे 100 कर्मचारी घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत.
4 / 5
टॉवर पडल्यानंतर अवघ्या काही सेकंदात धुळीचे मोठे लोळ उठलेले दिसून आले. हा ट्विन टॉवर सुपरटेक कंपनीने बांधला होता . आरके अरोरा असे सुपरटेक कंपनीच्या मालकाचे नाव आहे. आरके अरोरा यांनी 34 कंपन्या स्थापन केल्या आहेत. या कंपन्या नागरी विमान वाहतूक, सल्लागार, ब्रोकिंग, प्रिंटिंग, फिल्म्स, हाऊसिंग फायनान्स, बांधकाम क्षेत्रात काम करते.
5 / 5
23 नोव्हेंबर 2004 पासून सुरू होत आहे. जेव्हा नोएडा प्राधिकरणाने एमराल्ड कोर्टसाठी सेक्टर-93A मध्ये असलेला भूखंड क्रमांक-4 दिला. वाटप करून तळमजल्यासह 9 मजल्यांचे 14 टॉवर बांधण्यास परवानगी देण्यात आली होती. जमिनीचे वाटप झाल्यानंतर दोन वर्षांनी 29 डिसेंबर 2006 रोजी परवानगीत सुधारणा करण्यात आली. नोएडा प्राधिकरणाने सुधारणा करून सुपरटेकला 9 ऐवजी 11 मजल्यापर्यंत फ्लॅट बांधण्याची परवानगी दिली. यासोबतच टॉवर्सची संख्याही वाढवण्यात आली. प्रथम 15 आणि नंतर त्यांची संख्या 16 होती. 2009 मध्ये त्यात पुन्हा वाढ करण्यात आली. 26 नोव्हेंबर 2009 रोजी नोएडा प्राधिकरणाने पुन्हा 17 टॉवर बांधण्याची योजना मंजूर केली. त्यानंतरही ही परवानगी वाढतच गेली