PHOTO | राज्यभर संचारबंदी लागू, कुठं सुनसान तर कुठं वर्दळ; लोकांचा प्रतिसाद कसा ?

| Updated on: Apr 14, 2021 | 11:58 PM

14 एप्रिल हा संचारबंदीचा पहिला दिवस असल्यामुळे प्रशासनाला थोडी तारेवरची कसरत करावी लागली. (maharashtra curfew coronavirus spread)

1 / 5
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. तर शेकडो रुग्णांचा मृत्यू होता आहे. वेळेवर उपचार न मिळाल्याने किंवा औषधांच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करुन राज्य सरकारने कठोर निर्णय घेतला आहे. 14 एप्रिलच्या रात्रीच्या 8 वाजेपासून सरकारने कडक संचारबंदी लागू केली आहे. ही संचारबंदी 1 मे पर्यंत लागू राहील. 14 एप्रिल हा संचारबंदीचा पहिला दिवस असल्यामुळे प्रशासनाला थोडी तारेवरची कसरत करावी लागली. मुंबईत लोकांनी रात्री 8 वाजेपर्यंत काही ठिकाणी गर्दी केली होती. मात्र, नंतर हळूहळू गर्दी कमी झाली. मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात अशा प्रकारे शांतता पसरली होती. येथे फक्त पोलिसांचा पहारा होता. येथे नेहमी पर्यटक आणि मुंबईकरांची गर्दी असते. मात्र, संचारबंदीमुळे आज येथे शुकशुकाट होता.

2 / 5
मागील वर्षाच्या लॉकडाऊनच्या आठवणी थरकाप उडवणाऱ्या आहेत. लॉकडाऊनमुळे परप्रांतीय, मजूर, कामगार यांचे खूप हाल झाले होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होती. मात्र, यावेळी तसे नसून रेल्वे तसेच बसेस सुरु आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या गजबज असलेल्या शहरात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी तुलनेने धांदल कमी पाहायला मिळाली. संचारबंदी सुरु होण्यापूर्वी मुंबईत काही ठिकाणी गर्दी दिसत होती. मात्र, संचारबंदी प्रत्यक्ष सुरु होण्याआधी गेटवे ऑफ इंडियाच्या आवारात कोणीही नव्हते. नेहमीच लोकांची वर्दळ असलेला हा परिसर 14 एप्रिल रोजी संचारबंदीमुळे शांततामय झाला होता. येथे पोलिसांच्या गाड्या आणि सफाई कर्मचारी वगळता दुसरे कोणीही नव्हते.

3 / 5
संचारबंदीचा पहिला दिवस असल्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस महासंचालक संजय पांडे पत्रकार परिषदेत केले होते. यावेळी त्यांनी पोलीस शक्यतो बळाचा वापर करणार नाहीत, याची हमी त्यांनी दिली होती. तसेच, जर नागरिकांनी कायदा हातात घेतला किंवा सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली तर त्याची गयसुद्धा केली जाणार नाही, असेसुद्धा त्यांनी सांगितले होते. त्यानुसार आज कुलाबा परिसरात पोलिसांनी नागरिकांना समजाऊन सांगत नियमांचे पालन करण्यास सांगितले. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात पोलीस अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत होते.

4 / 5
 दिवसभर धावपळ केल्यानंतर मुंबईकर समुद्रकीनारी येतात. शांत बसून समुद्राच्या सानिध्यात मुंबईकर रोज आपला वेळ घालवतात. मात्र, सध्या लागू केलेल्या संचारबंदीमुळे  14 एप्रिल रोजी  मरीन ड्राईव्हवर एकदम शांतता होती. रात्री 8 च्या नंतर मरीन ड्राईव्हवर पाण्याच्या खळखळाटाशिवाय कशाचाही आवाज नव्हता.

5 / 5
संचारबंदी सुरु होण्यापूर्वी मुंबईच्या काही भागामध्ये लोकांची वर्दळ होती. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरातसुद्धा काही लोक होते. या सर्वांना येथून हलवण्याचं काम मुंबई पोलिसांनी केलं. त्यांनी सर्वांना घरी जाण्यास सांगितले. कोणी घराच्या बाहेर दिसलेच तर घराबाहेर येण्याचे कारण पोलिसांकडून विचारण्यात येत होते.  मुंबईत पोलीस अशा प्रकारे ठिकठिकाणी गस्त घालत होते.