करिना कपूर खान सध्या तिच्या प्रेग्नन्सीचा आनंद घेत आहे. लवकरच ती दुसऱ्यांदा आई होणार आहे.
गरोदरपणात आतापर्यंत करिनाचे अनेक फोटो समोर आले आहेत, ज्यात ती आपल्या बेबी बंपला फ्लॉन्ट करताना दिसली आहे
करिना तिच्या गर्भावस्थेविषयी सतत फिट राहण्याचा प्रयत्न करत असते. अलीकडेच तिचे योगा करतानाची काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत, जी व्हायरल होत आहेत.
करिना कपूर खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिच्या दुसर्या मुलाबद्दल लोकांमध्येसुद्धा बरीच उत्सुकता आहे.
करिनाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो आणि काही व्हिडिओ शेअर केले आहेत, ज्यात ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. करिनानं एका फोटोमध्ये ब्लॅक अँड प्रिंट स्पोर्ट्स ब्रा आणि जेगिंन्स परिधान केली आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये तिनं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.