PHOTO | ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा विचार करताय? भारतातील ‘हे’ किनारे ठरतील उत्तम पर्याय!
आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करण्याचा ट्रेंड बर्यापैकी वाढला आहे. डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ लोकांमध्ये वाढत असताना, समुद्रकिनार्यांना अधिक पसंती दिली जात आहे.
1 / 7
आजकाल वेगवेगळ्या ठिकाणी लग्न करण्याचा ट्रेंड बर्यापैकी वाढला आहे. डेस्टिनेशन वेडिंगची क्रेझ लोकांमध्ये वाढत असताना, समुद्रकिनार्यांना अधिक पसंती दिली जात आहे.
2 / 7
केरळ : केरळमधील कोची बीच लहान असला तरी, आपल्या समुद्रकिनार्यावरील लग्नासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. कोची मधील हेरिटेज हॉटेल्स आपल्या लग्नासाठी योग्य विवाहस्थळ ठरू शकतात.
3 / 7
अंदमान : देशातील सर्वात सुंदर बीच अंदमानमध्ये आहेत. बरेच लोक हनिमूनसाठी अंदमानला पसंती देतात. अंदमानमध्ये बरीच लक्झरी हॉटेल आहेत. अंदमान हे डेस्टिनेशन वेडिंगसाठी एक अतिशय सुंदर ठिकाण आहे.
4 / 7
महाबलीपुरम : तामिळनाडूमधील महाबलीपुरम हे डेस्टिनेश वेडिंगसाठी सर्वात चांगले स्थान आहे.
5 / 7
गोवा : गोव्याचा समुद्र किनारा हा केवळ भारतीयांमध्येच नाहीतर, जगभरातील पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी, आपले पाहुणे समुद्रासोबतच इतर बर्याच गोष्टींचा आनंद घेऊ शकतात. समुद्राजवळील अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लग्नासाठी उत्तम ठिकाण आहेत.
6 / 7
कोवलम : कोवलम हे देखील डेस्टिनेशन वेडिंगसाठी सर्वात सुंदर ठिकाण आहे. जर आपण लक्झरी बीच वेडिंगची योजना आखत असाल तर, आपल्यासाठी हा सर्वात परिपूर्ण बीच आहे.
7 / 7
पदुच्चेरी : पदुच्चेरी हे ऑफबीट वेडिंग डेस्टिनेशन आहे. परंतु, आपल्याला काहीतरी हटके आणि मेमोरेबल ट्राय करायचे असेल, तर ही उत्तम जागा आहे. पदुच्चेरी इथल्या खाद्यपदार्थांसाठी लोकप्रिय आहे.