मुंबईपासून जवळ असणाऱ्या नाशिक शहराला त्याचे धर्मिक महत्त्व आहे. येते भरणाऱ्या कुंभमेळ्यामुळे या शहराला विषेश महत्त्व आहे. पण सध्या नाशिक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ते कारण म्हणजे नांदूरमधमेश्वर मधील अभयारण्य. या अभयारण्यामध्ये सध्या अनेक प्रकारच्या पक्षांचे आगमन झाले आहे.
या अभयारण्यामध्ये करण्यात आलेल्या पक्षी निरीक्षणातून येथे २८० हून अधिक प्रकारचे पक्षी असल्याचे आढळून आले आहे. येथील जलाशयात २४ जातीचे मासे आहेत परिसरात ४०० हून अधिक प्रजातीच्या वनस्पतींची विविधता आहे या परिसरात मांजर, कोल्हे, मुंगूस, लांडगे, बिबटे, विविध प्रकारचे साप असे अनेक प्राणीमात्रा दिसून येतात.
या वर्षी या अभयारण्यामध्ये 17 हजार हून अधिक पक्ष्यांचे आगमन झाले यात फ्लेमिंगो ,टिल्स, पोचार्ड, विजन, गडवाल, शॉवलर, पिनटेल, क्रेन, गारगनी, टर्नस्, गज, पेलिकन, गॉडविट, सॅन्ड पायपर, क्रेक, कर्ल्यु, हॅरियर, प्रॅटिनकोल, गल सारख्या पक्षांनी स्थलांतर केले आहे.
येथे पान कोंबडी, मुग्धबलाक, गायबगळे, मध्य बगळे, खंड्या, आयबीस, स्टॉर्क इत्याही स्थानिक पक्षी येथे सातत्याने दिसून येत असतात. या अभयारण्यामध्ये स्थलातंरित पाणपक्षी येथे जास्त प्रमाणात आढळून येतात. तर पाणकावळे, पाणडुबी, रोहित, चमचा, धनवर, कुट स्थानिक स्थलांतरित पक्षीही येथे आढळून येत असतात.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने येथे पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. पक्षांचे निरीक्षण आणि पुस्तकी ज्ञान यातून विद्यार्थ्यांना पक्षांची माहिती मिळावी यासाठी पक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी आम्ही पाहुण्यांसह मुलांना घेऊन पक्षी निरीक्षणासाठी आलो असे तेथे आलेले पर्यटक सांगतात.