तुम्हालाही हॉटेलमध्ये किंवा बाहेर जाऊन खायला आवडतं का ? ख्रिसमस आणि नव-वर्षानिमित्त कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत बाहेर जाऊन खाणं हे खूप कॉमन आहे. मात्र हॉटेलमधलं चविष्ट अन्न पाहून ओव्हरइटिंग म्हणजेच जास्त खााण्याची चूक करू नका. अन्यथा तुमचं वजन तर वाढेलच पण आरोग्याचेही नुकसान होऊ शकते. काही सोप्या ट्रिक्सचा अवलंब करून तुम्ही अतीखाणे थांबवू शकता.
हळू-हळू खा : जर तुमच्या आवडीचा पदार्थ पाहून तुमचा कंट्रोल रहात नसेल आणि अती खाल्ले जात असेल तर ते थांबवण्याचा सोपा उपाय म्हणजे आपल्या प्लेटमध्ये आधी थोडाच पदार्थ वाढून घ्या आणि तो हळू-हळू खा. कुटुंबीय किंवा मित्र- मैत्रिणींशी गप्पा मारत जेवा.
सलॅड मागवा : हॉटेलमध्ले पदार्थ कितीही चविष्ट असले तरी ते आपल्या आरोग्यासाठी फार फायदेशीर नसतात. त्यामुळे ते पदार्थ जास्त खाऊ नयेत. त्यासाठी मेन कोर्स आधी सलॅड किंवा सूप मागवा व त्याचे सेवन करा. त्यामुळे तुमचे पोट आधीत भरेल व तुम्ही बाहेरचे पदार्थ कमी खाल.
पाणी पित रहा : अती खाण्याच्या सवयीमुळे तुमचे वजन वेगाने वाढू शकते. पण त्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही कधीच बाहेरचे खाऊ नये. मात्र बाहेर जेवतााना मध्ये-मध्ये पाणी पित रहावे. त्याने पोट लवकर भरते व अतीखाणे टाळता येते.
Cheat Day ही गरजेचा : वजन कमी करण्याच्या नादात काही लोक बाहेर खाणं पूर्णच बंद करतात. ही चांगली सवय असली तरी त्यामुळे नुकसानही होऊ शकतं. कधी बाहेर जायची वेळ आलीच तर अती खाल्लं जाऊ शकतं. त्यामुळे डाएट फॉलो करतानाच एखादा चीट डे ही फॉलो करता येतो. त्यामुळे कधी-कधी तुम्ही बाहेरचे पदार्थ खाऊ शकता.