Summer Skin care: उन्हाळ्यात टाचांना भेगा पडल्या भेगा ? या घरगुती उपायांनी मिळवा आराम

| Updated on: Mar 26, 2025 | 12:53 PM

Cracked Heels Relief: उन्हाळ्यात त्वचेसोबतच संपूर्ण शरीराची काळजी घेणे आवश्यक होते. हिवाळ्यात टाचांना तडे जाणे किंवा भेगा पडणे, ही एक सामान्य समस्या आहे. पण उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना तडे जात असतील तर तुम्ही काही घरगुती उपाय करून पहा.

1 / 6
उन्हाळा आला रे आला की त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात बहुतेक लोक चेहरा आणि हातांची काळजी घेण्याकडे विशेष लक्ष देतात, परंतु अनेकदा पायांच्या काळजी घेण्यास दुर्लक्ष करतात.  परिणामी टाचांना भेगा पडतात.

2 / 6
हिवाळ्यात कोरड्या त्वचेमुळे टाचांना तडे जातात, पण उन्हाळ्यातही तुमच्या टाचांना तडे जात असतील तर ही चिंतेची बाब ठरू शकते. उन्हाळ्यात टाच फुटण्यामागे अनेक कारणे असू शकतात. पायांची त्वचा जास्त कोरडी पडणे, पाण्याची कमतरता, धूळ, जास्त घाम येणे आणि चुकीच्या चपला किंवा पादत्राणं घातल्यानेही भेगा पडू शकतात.

3 / 6
उन्हाळ्यात टाचांना तडे जाण्याची कारणे : टाचांना भेगा पडू नयेत यासाठी आधी त्याची कारणे समजून घेणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात टाचांना तडे जाण्याची ही मुख्य कारणे असू शकतात. शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव होते, त्यामुळे टाचांना तडे जाऊ लागतात. याशिवाय जास्त वेळ उघड्या पायांनी चालण्याने त्वचा कडक आणि कोरडी होते, ज्यामुळे तडे जाऊ शकतात. घट्ट, सिंथेटिक किंवा खराब दर्जाच्या चपला किंवा पादत्राणे घातल्याने देखील टाचा लवकर क्रॅक होऊ शकतात. शरीरात व्हिटॅमिन ई, ए आणि ओमेगा-३ फॅटी ॲसिडच्या कमतरतेमुळे टाचांना भेगा पडू शकतात.

4 / 6
रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावा: नारळाच्या तेलात अँटी-बॅक्टेरियल आणि मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात, जे मृत त्वचा लवकर काढून टाकण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्याने पाय धुवा. टाचांवर खोबरेल तेल लावून चांगले मसाज करा. रात्रभर सुती मोजे घालून झोपा. दररोज असे केल्याने काही दिवसातच तुमच्या टाचा मऊ होतील.

5 / 6
मध आणि कोमट पाण्याचा वापर : मध हे एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवते आणि टाचांच्या भेगा दूर करते. यासाठी एका टबमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात 2-3 चमचे मध टाका. आपले पाय त्यात 15-20 मिनिटे बुडवून ठेवा. नंतर पाय हळूवारपणे स्क्रब करा, आपले पाय पुसून घ्या आणि थोडे क्रीम लावा. आठवड्यातून 3 वेळा हा उपाय केल्याने टाच लवकर बरी होईल.

6 / 6
कोरफड आणि ग्लिसरीन लावा: कोरफडमध्ये दाहक-विरोधी आणि उपचार गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचा मऊ होते. तुमच्या टाचांना भेगा पडल्या असतील तर 2 चमचे कोरफडीच्या गरामध्ये 1 चमचे ग्लिसरीन मिसळा. रात्री हे मिश्रण टाचांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. रात्रभर ते तसेच राहू द्या आणि सकाळी पाया धुवा. कोरफडीचा गर टाचांना आतून पोषण देतो आणि त्यांना लवकर दुरुस्त करतो.