डालगोना कॉफी (Dalgona Coffee)- फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रावर लोकांनी मोठ्या प्रमाणात डालगोना कॉफीचे फोटो शेअर केले. ही फॉफी दक्षिण कोरियामध्ये जास्त प्रमाणात बनवल्या जाते. या डालगोना कॉफीला क्लाउड कॉफीसुद्धा म्हटल्या जातं. यासाठी कॉफी, साखर, गरम पाणी आणि थंड दूधाची आवश्यकता आहे. लॉकडाऊन काळात या कॉफीनं इंटरनेटवर खऱ्या अर्थानं राज्य केलं होतं.
बनाना ब्रेड (Banana Bread)- हा एक थोडा गोड पदार्थ आहे. जो चहा कॉफीसोबत खालल्या जातो. मैदा आणि ड्राय फ्रूटपासून हा ब्रेड बनवल्या जातो. ही लॉकडाऊनमध्ये सगळ्यात जास्त सर्च केलेली रेसिपी होती.
मॅगी ऑमलेट (Maggi Omelete)- मॅगी आणि ऑमलेट हे सगळ्यांचं आवडतं खाद्य आहे, कारण हे लवकरात लवकर बनवता येतं. अशात हे दोन रेसिपी एकसोबत येणं म्हणजे मज्जाच ना..! लॉकडाऊनमध्ये हॉस्टेल, पीजीमध्ये अडकलेल्या लोकांसाठी हा उत्तम पर्याय ठरला होता.
चॉकलेट समोसा पाव (Chocolate Samosa Pav)- चॉकलेट प्रेमींसाठी ही रेसिपी मेजवानीच ठरली, यासाठी पावाच्या तुकड्याला चॉकलेट सीरप लावून त्यात समोसा टाकला जातो. मात्र काहींना ही रेसिपी खूप आवडली तर काहींच्या हेट लिस्टमध्ये गेली.
चहा लाटे (Chai Latte)- चहा लाटे यावर्षीची सगळ्यात जास्त टीका झालेली डिश होती. यात खडा मसाला म्हणजेच दालचिनी, जावित्री आणि कोकोनट मिल्क एकत्र करण्यात येतं.