माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज चौथ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी संगमनेर तालुक्यातील त्यांच्या जोर्वे गावात जावून सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे.
शिरुर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे. अजित पवारांनी मला आव्हान दिलं असलं तरी ते शिरूर लोकसभेत मतदान कुठं करणारेत अशी त्यांना प्रतिक्रिया दिली आहे.
लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळपासूनच सुरुवात झालीय. यामध्ये जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारधी येथे आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी सरकार देखील बदलत राहिले पाहिजे म्हणत AIMIM चे उमेदवार इम्तियाज जलील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आहे
यापुढे निवडणूक लढणार नाही पण भाजप प्रवेश मात्र लवकरच होणार असं म्हणत एकनाथ खडसे यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला आहे