Force Citiline : मोठी कुटुंब असलं तरी चालेल! फिरायला जाण्याचं नो टेन्शन, जाणून घ्या 10 सीटर कारबाबत
Force Citiline 10 Seater : मोठं कुटुंब असलेल्यांना कायम फिरायला जाताना दोन गाड्या कराव्या लागतात. मात्र आता तुमचं टेन्शन दूर झालं आहे. कारण मार्केटमध्ये नवी 10 सीटर गाडी आली आहे. चला जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स
1 / 5
तुमचं कुटुंब मोठं आहे आणि त्यासाठी तुम्ही मोठी गाडी घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. फोर्स मोटर्सने भारतीय बाजारात Force Citiline ही गाडी 15.93 लाख (एक्स शोरूम) किमतीवर लाँच केली आहे. या कारमध्ये एकावेळी 10 जण आरामात प्रवास करू शकतात. (Photo: Force Motors)
2 / 5
या गाडीचं डिझाईन ट्रॅक्स क्रुझरसारखं आहे. पण काही फरक असून सिटीलाइन ट्रॅक्सपेक्षा वेगळी ठरते. सिटीलाइनच्या ग्रिल आणि फ्रंट बंपर बॉडी कलरमध्ये येते. ग्रिलवर सिटीलाइनचा लोगो आहो. असाच लोगो आपल्याला फोर्स गुरखा किंवा अर्बानियामध्ये पाहायला मिळतो. (Photo: Force Motors)
3 / 5
या गाडीमध्ये चांगली स्पेस आहे. या गाडीमध्ये 10 जण आरामात बसू शकतात. पण काही फीचर्स कमी असू शकतात. यात इंफोटेनमेंट सिस्टम दिलेलं नाही. ही गाडी लँड रोव्हर डिफेंडर 130 पेक्षा छोटी आहे. (Photo: Force Motors)
4 / 5
सिटीलाइन फ्रंट व्हीलच्या वर थ्री स्लॉट एअर व्हेंट्स दिले आहेत. व्हील आर्क आणि बॉडीच्या खालच्या पार्टमध्ये ब्लॅक प्लास्टिक फिनिशिंगसह येतो. फोर्सच्या बिग कारमध्ये ड्युअल एसी सिस्टम आहे. त्यामुळे प्रत्येकाला थंडावा मिळतो. या व्यतिरिक्त चांगला डॅशबोर्ड आहे. (Photo: Force Motors)
5 / 5
फोर्स सिटीलाइनमध्ये 4 सिलेंडर, 2596 सीसी इंजिन दिलं आहे. ट्रान्समिशनसाठी 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे, सिटीलाइनमध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि इलेक्ट्रिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशनसारखे फीचर्स आहेत. (Photo: Force Motors)