PHOTOS : आदिवासींच्या हक्कासाठी रस्त्यासोबतच रुग्णालयातही लढाई, लोकसंघर्ष मोर्चाचा जळगावात अनोखा उपक्रम
आतापर्यंत आदिवासींच्या जमिनींपासून इतर सर्वच प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई देणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने आता कोरोना काळात त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नातही पुढाकार घेतला.
1 / 10
आतापर्यंत आदिवासींच्या जमिनींपासून इतर सर्वच प्रश्नांवर रस्त्यावरची लढाई देणाऱ्या लोकसंघर्ष मोर्चाने आता कोरोना काळात त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नातही पुढाकार घेतला. आदिवासी नागरिकांना वेळीच योग्य उपचार मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वात लोकसंघर्ष मोर्चाने जळगावात कोविड सेंटर सुरु केलं.
2 / 10
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील वाढता प्रकोप बघून लोकसंघर्ष मोर्चाने येथील 'शासकीय तंत्रनिकेतन'च्या इमारतीत अडीच महिन्यांपूर्वी कोविड केअर सेंटर सुरु केले होते. सेंटरमध्ये आजपर्यंत एकूण 936 रुग्ण दाखल झाले आहे. तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या धडपडीमुळे आतापर्यंत 920 रुग्ण बरे होऊन घरी परतले.
3 / 10
कोविडच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायूचे महत्व आणि मूल्य सर्वांनाच लक्षात आले आहे. म्हणूनच सुटी झालेल्या रुग्णांना लोकसंघर्ष मोर्चाच्यावतीने कडूनिंबाचे रोप दिले जाते. ते जगविण्याचे व वाढविण्याचे वचनही घेतले जाते. नुकतीच सुटी झालेल्या रुग्णांनाही लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने रोप उपलब्ध करून देऊन त्यांना वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
4 / 10
जळगावात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेथे सर्वसामान्य लोकांना पैसे देऊनही बेड उपलब्ध होत नाहीयेत, चांगली आरोग्य सुविधा मिळत नाहीये तेथे लोकसंघर्ष मोर्चाने नि:शुल्क कोरोना केअर सेंटर उभं केलंय. लोकसंघर्ष मोर्चाने नि:शुल्क कोविड केअर सेंटर उभारत रुग्णांशी आपुलकी आणि स्नेहभावना जपली. त्यांना अत्यंत चांगली आरोग्य व्यवस्था पुरवण्यात येत आहे.
5 / 10
कोरोना रुग्णांना आवश्यक ती सर्व औषधे, रुग्णांना जास्त त्रास झाल्यास त्यांना योग्य त्या आरोग्यसेवा पुरवण्यासाठीची चोख व्यवस्था, रुग्णवाहिकेची तात्काळ उपलब्धता हे या सेंटरचे वैशिष्ट्य ठरत आहे. यासोबतच सकाळी चहा, दुध, अंडी, केळी, नाश्ता तसेच दुपारचे सुग्रास जेवण, संध्याकाळी चहा-दुध, रात्रीचे जेवण हे देखील उत्तम दर्जाचे पुरविले जात आहे. ताज्या पालेभाज्या,फळे ई. देखील उपलब्ध करुन दिले जात आहेत. सेंटरमधील स्वयंपाक गृहात विशेष स्वच्छता पाळली जात असून संपूर्ण सेंटरच्या आतील व बाहेरील स्वच्छतेसह सॅनिटायझेशन करण्याची काळजी घेतली जात आहे.
6 / 10
लोकसंघर्ष मोर्चा कोविड केअर सेंटरमधील सर्व स्टाफ, डॉक्टर, नर्स,स्वयंपाकी, स्वयंसेवक,सफाई कामगार आदी तत्परतेने सेवा देत आहेत. सर्व रुग्णांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. तसेच, रुग्णांशी काळजीने संवाद साधत त्यांची धास्ती कमी करुन बरे होण्याबाबत त्यांच्या मनात सकारात्मकता निर्माण केली जात आहे. वॉर्ड बॉय म्हणून काम पाहणारे अजय मनोरे आणि विकास वाघ हे उत्तम व तत्पर सेवा देत आहेत.
7 / 10
आरोग्य सेवा-सुविधा पुरवण्यासोबतच येथील रुग्णांची मनोरंजनाची देखील व्यवस्था केली गेली आहे. कार्यकर्त्यांकडून रुग्णांची काळजी घेणे, त्यांना योग्य सल्ले आणि वेळोवेळी आवश्यक सूचना देणे सुरू आहे. या सेंटरमधून बरे होऊन घरी परत जाणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच समाजातील सर्वच स्तरातून येथील व्यवस्थेचे कौतुक केले जात आहे.
8 / 10
ही सर्व व्यवस्था कोणतेही सरकारी अनुदान न घेता समाजातील सर्व स्तरातील दात्यांकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक व वस्तू स्वरूपातील मदतीतून केली जात आहे हे विशेष. या सर्व व्यवस्थेसाठी प्रतिभा शिंदे यांच्या मार्गदर्शनात सचिन धांडे, छोटूभाऊ, भरत कर्डिले, विशाल भाई, दामोदर भारंबे, कलींदर तडवी, किरण, प्रमोदभाऊ आदी कार्यकर्ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
9 / 10
सरकारी रुग्णालयातून मिळणाऱ्या मोफत आरोग्य सेवा व सुविधा सामान्य जनतेपर्यंत पोहोचणे महाकठीण झाले आहे. खासगी रुग्णालयात उपचार करून घेणे अतिशय महागडे ठरते. या सगळ्यात सामान्य जनमानसाचा बळी जाऊ नये तथा त्यास चांगली आरोग्य सेवा मिळावी व तीही मोफत यासाठी लोकसंघर्ष मोर्चा मार्फत कोविड केअर सेंटर (नि:शुल्क) उभारण्यात आले. आर्थिक व वस्तू स्वरुपातील मदतीचे व्यवस्थापक व कार्यकर्त्यांच्या वतीने आवाहन करण्यात आल्यानंतर समाजातील सर्व स्तरातून मदतीचे अनेक हात पुढे आले.
10 / 10
प्रत्येक जण आपापल्या परीने आपला वाटा उचलत आहेत. कोणी आर्थिक स्वरुपात मदत करत आहेत तर कोणी किराणा सामान, दुध, चहा, अंडी, फळे, भाजीपाला दररोज आणून देत आहेत. शिवाय, डीस्पोजेबल साहित्य, मेडिकल साहित्य या स्वरुपात देखील मदत मिळत आहे. काहीजण तर स्वयंसेवक म्हणून पूर्णवेळ विनामोबदला काम करत आहेत. अनेक ज्ञात व अज्ञात व्यक्तींचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या कामासाठी सहकार्य लाभत आहे.