Marathi News Photo gallery From Amitabh abhishek Bachchan to tripti dimri these celebrities purchased property worth crores of rupees
Year Ender 2024 : अमिताभ बच्चन, अभिषेक, दीपिका पडूकोण ते तृप्ती डिमरी.. या सेलिब्रिटींनी खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी, सगळ्यात जास्त पैसे कोणी मोजले ?
बॉलीवूडमधील अनेक अभिनेत्यांनी यावर्षी करोडोंच्या मालमत्तेत गुंतवणूक केली आहे. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन यांच्यापासून ते तृप्ती डिमरीपर्यंत अनेक नावांच्या त्यात समावेश आहे. कोणी, कुठे, किती पैसे प्रॉपर्टीमध्ये गुंतवले; टाकूया एक नजर..
1 / 9
सप्टेंबर महिन्यात बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांनी मुलुंड पश्चिमेकडील इटर्निया येथे 2.54 कोटी रुपये मोजून जागा खरेदी केली. या व्यवहारासाठी त्यांनी 15.23 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. ( photos : Social Media)
2 / 9
वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत अभिनेता अभिषेक बच्चननेही याच इमारतीत 2.22 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती. त्यासाठी स्टॅम्प ड्युटीपायी त्याने 13.33 लाख रुपये मोजले.
3 / 9
मनोरंजन क्षेत्राकडून राजकारणाकडे वळलेल्या अभिनेत्री कंगना राणौत यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकून त्या खासदारही झाल्या. कंगना यांनी ऑगस्ट महिन्यात ओशिवरा येथे 1.56 कोटींची मालमत्ता खरेदी केली. स्टॅम्प ड्युटीसाठी तिने 9.3 लाख रुपये मोजले.
4 / 9
या वर्षी में महिन्यात चॉकलेट बॉय, सुपरस्टार शाहिद कपरनेही मालमत्ता खरेदी केली. त्याने लोअर परेलच्या 360 वेस्ट ओबेरॉय रिअल्टी येथे 58.66 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली. स्टॅम्प ड्युटीसाठी त्याने 1.7 कोटी रुपये मोजले.
5 / 9
ॲनिमल, भूलभुल्लैया फेम अभिनेत्री तृप्ती डिमरी हिच्याकडे सध्या अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आहेत. तिने जून महिन्यात 14 कोटी रुपये खर्च करून वांद्रे येथील कार्टर रोडवर मालमत्ता खरेदी केली.
6 / 9
मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या मोठ्या पडद्यापासून दूरच आहे. लाल सिंग चढ्ढा अपयशी ठरल्यानंतर त्याने मोठा ब्रेक घेतला.पण याच आमिरने वांद्रे येथील बेला व्हिस्ता अपार्टमेंटमध्ये 9.76 कोटी मोजून अपार्टमेंट खरेदी केली. त्यासाठी त्याने 58.54 लाख रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरली.
7 / 9
लेक दुआच्या जन्मानंतर अभिनेत्री दीपिका पडूकोण सध्या ब्रेकवरच आहे. तिने सप्टेंबर महिन्यात तिचे वडील प्रकाश पडूकोण यांच्यासह वांद्रे येथे 17 कोटींची मालमत्ता खरेदी केली.
8 / 9
दीपिकाच्या या खरेदीनंतर अभिनेता रणवीर सिंग याची आई अंजू यांनी ही वांद्रे येथील त्याच इमारतीत 19 कोटींचा फ्लॅट विकत घेतला. स्टॅम्प ड्युटीपायी त्यांनी 95 लाख रुपये मोजले.
9 / 9