अनुष्का शर्मा ते सोनाक्षी सिन्हा, ॲक्टिंगच नव्हे ‘या’ कामातही माहीर आहेत या सेलिब्रिटी

| Updated on: Oct 25, 2024 | 12:25 PM

गेल्या काही वर्षांत बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी अभिनयासोबतच व्यवसायातही नशीब आजमावलं आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी प्रभावी उद्योजक म्हणून यश संपादन करून स्वतःला सिद्ध केले आहे. नाविन्यपूर्ण स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करण्यापासून ते आयकॉनिक ब्रँड तयार करण्यापर्यंत या अभिनेत्री आघाडीवर आहेत.

1 / 6
शाहरुख खान, सलमान खान आणि अक्षय कुमार सारख्या अभिनेत्यांसोबत काम केलेल्या शिल्पा शेट्टीची ओळख फक्त एक अभिनेत्री म्हणून नव्हे तर उद्योजक  अशीही आहे. स्टार्टअप इकोसिस्टममध्ये ती सामील झाली. शिल्पा ही  ममाअर्थ या स्किनकेअर आणि वेलनेस ब्रँडमध्ये  तसेच आणि ॲग्री-टेक स्टार्टअप फार्मर्स कनेक्टमधील सुरुवातीच्या गुंतवणूकदारांपैकी एक आहे. शिल्पाने सिंपली सोलफुल हे तिचे फिटनेस आणि हेल्थ ॲप देखील लाँच केले . तसेट बॅस्टियन नावाचं तिचं एका आलिशान रेस्टॉरंटही आहे. ( Photos : Social Media)

2 / 6
अवघ्या 31 वर्षांची असलेली आलिया भट्ट ही एक यशस्वी आणि नामवंत अभिनेत्री तर आहेच पण ती एक यशस्वी बिझनेसवुमनही आहे. Ed-a-Mamma हा तिचा एक क्लोदिंग ब्रँड आहे. जो खास लहान मुलांना लक्षात ठेऊन त्यानुसार कपडे बनवतो. एवढेच नव्हे  तर आलियाचे  इंटरनल सनशाइन  नावाचे  स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. आलियाच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत  चित्रपट आणि मालिकाही बनवण्यात आल्या आहेत.

3 / 6
अभिनेत्री अनुष्का शर्माने 2017 मध्ये तिचा कपड्यांचा ब्रँड नुश लॉन्च केला. तर 2013 मध्ये, तिने तिचा भाऊ कर्णेश सोबत क्लीन स्लेट फिल्म्सची स्थापना केली. तिने Slurp Form मध्ये देखील गुंतवणूक केली, असून त्याची ब्रँड अँबेसेडर आहे. काम केले. याशिवाय तिने पती विराट कोहलीसोबत मीट ब्रँड ब्लू ट्राइब फूड्समध्ये गुंतवणूक केली आहे.

4 / 6
टीव्हीच्या दुनियेत स्वत:चे नाव कमावल्यानंतर मोठ्या पडद्यावर स्वत:ची ओळख निर्माण करणारी मौनी रॉय ही देखील अभिनेत्री आणि उद्योजिका आहे. ती बदमाश या रेस्टॉरंटची मालक आहे, तेथे अस्सल बॉलीवूड व्हाईब्ससह उत्तम भारतीय जेवण मिळतं. सध्या मुंबईत त्यांचे दोन रेस्टॉरंट आऊटलेट्स आहेत. बँगलोरमध्ये या रेस्टॉरंटच्या त्याच्या चार शाखा आहेत.

5 / 6
हृदयस्पर्शी कथा सांगणाऱ्या चित्रपटांमधून आपली चमक दाखवणारी क्रिती सेनन हिने तिचे  ब्लू बटरफ्लाय फिल्म्स हे तिचे प्रोडक्शन हाऊस लाँच केले. तसेच स्किनकेअरच्या आवडीतून जन्मलेल्या हायफन नावाच्या स्किनकेअर ब्रँडचीही स्थापना केली. याव्यतिरिक्त, क्रितीची मिस टेकन नावाची क्लोथिंग लाइन आहे. याशिवाय ती द ट्राइब हा फिटनेस ट्रेनिंग स्टुडिओही चालवते.

6 / 6
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही सोजी या नेल ब्रँडची को-फाऊंडर आहे. या ब्रँडमध्ये प्रेस-ऑन नेल्स ची बरीच व्हरायटी आहे.