Year Ender 2024 : 2024 मध्ये घरात नव्या पाहु्ण्याचे आगमन, हे सेलिब्रिटी बनले पालक

| Updated on: Dec 11, 2024 | 3:06 PM

सरत्या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी गुड न्यूज शेअर केली. दीपीकापासून ते यामी गौतमपर्यंत अनेक सेलिब्रिटींच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले, ते पालक बनले. कोण कोण आहे या लिस्टमध्ये ?

1 / 6
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पडूकोण आणि अभिनेता रणवीर सिंग या दोघांनी या वर्षाच्या सुरूवातीलाच चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली. मात्र अनेकांनी तिच्यावर टीका करत फेक बेबी बम्प असल्याचा टोमणाही मारला. पण त्यावर दीपीकाने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. अखेर 8 सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. दीपीका - रणवीरच्या लेकीचं नाव आहे दुआ.( photos : Social Media/Instagram)

2 / 6
रिचा चढ्ढा आणि अली फैझल हेही बॉलिवूडमधलं बहुचर्चित कपल. दोघांच्याही मॅटर्निटी फोटोशूटचे फोटो शेअर करत त्यांनी सर्वांना ही गुड न्यूज दिली. 16 जुलै रोजी त्यांच्या लेकीचा जन्म झाला.

3 / 6
फॅशन डिझायनर मसाबा गुप्ता आणि अभिनेता सत्यदीप मिश्रा यांनी एप्रिल महिन्यात प्रेग्नंन्सीची घोषणा केली.  love, blessings, and banana chips.. असं लिहीत मसाबाने ही पोस्ट शेअर केली. 11 ऑक्टोबर 2024मध्ये त्यांना कन्यारत्नाचा लाभ झाला.

4 / 6
अभिनेता वरूण धवन आणि पत्नी नताशा यांनी फेब्रुवारीत प्रेग्नन्सीची घोषणा केली. 3 जून रोजी त्यांच्या मुलीचा लाराचा जन्म झाला.

5 / 6
अभिनेत्री यामी गौतम आणि दिग्दर्शक आदित्य धर हेही यावर्षी पालक बनले. में महिन्यात त्यांच्या मुलाचा वेदाविदचा जन्म झाला.

6 / 6
अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यावर्षी दुसऱ्यांदा पालक बनले. फेब्रुवारीत त्यांच्या मुलाचा, अकायचा जन्म झाला. त्यांना वामिका नावाची एक मुलगीदेखील आहे.