विशेष म्हणजे स्वत: आमिर खाननं शाहरुख खानचा कॅमिओ सीन शूट केल्याची चर्चा आहे.
करीना कपूर, माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टीसह अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
शाहरुख आणि करीना कपूरनं अनेक सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. करीनानं त्याच्यासोबत डान्स करतानाचा फोटो शेअर केला आहे. सोबतच तिनं 'वाढदिवसाच्या शुभेच्छा किंग खान, नेहमी असंच डान्स करत राहुयात. तू माझा सर्वात प्रेमळ, दयाळु सुपरस्टार आहेस.' असं कॅप्शनही दिलं आहे.
दिव्या दत्तानं शाहरुखसोबत एक फोटो शेअर करत 'वाढदिवसाच्या शुभेच्छा शाहरुख खान, सगळ्यात चार्मिंग को-स्टारला खूप खूप शुभेच्छा', असं म्हटलं आहे.
जुही चावलानं शाहरुखला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्याचा वाढदिवस साजराही केला आहे. शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त 500 रोपं लावल्याचं जुहीनं ट्विटमध्ये म्हटलं आहे.
माधुरी दीक्षितनंही शाहरुखचा डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 'आपण भेटतो तेव्हा मजा, जादू आणि खूप प्रेम असतं. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शाहरुख,' असं टितने म्हटलं आहे.
आलिया भट्टनंही शाहरुखला इन्स्टाग्रामवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.
कतरिना कॅफनं इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शाहरुखसोबतचा फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
शिल्पा शेट्टीनही शाहरुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिनं शाहरुखसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.