Marathi News Photo gallery From 'Kaua Biryani' to 'Kamathipura Razia Bai ka tha?' Today is the birthday of actor Vijay Raj who enchanted the audience with this dialogue
Vijay Raaz : ‘कौआ बिर्याणी’ ते ‘ कामाठीपुरा रझिया बाई का था?’ या डायलॉगमधून प्रेक्षकांवर जादू करणाऱ्या अभिनेता विजय राज यांचा आज वाढदिवस
अभिनयासोबतच विजय राज त्याच्या कॉमेडी व्यतिरिक्त त्याच्या दमदार आवाजासाठी देखील ओळखले जातात. त्यांचा आवाज अनेक चित्रपटांमध्ये निवेदक म्हणून ऐकायला मिळेल.
1 / 7
अनेकांना बॉलीवूड अभिनेता विजय राज नावाने ओळखत येणार नाही . परंतु रन चित्रपटातील कौआ बिर्याणी म्हणताच अनेकांना हा अभिनेता आठवेल. बॉलीवूडमध्ये विनोदी व दमदार अभियानांसाठी अभिनेता विजय ओळखला जातो.एखाद्या चित्रपट फ्लॉप झाला तरीही चित्रपटातील विजयचे पात्र मात्र हिट झालेले पाहायला मिळते.
2 / 7
विजय आज आपला 59 वा वाढदिवस साजरा करतआहेत. 5 जून 1963 रोजी एका सामान्य कुटुंबात जन्मलेला विजय अभ्यासात ठीकठाक होते. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या किरोरीमल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्याच थिएटर ग्रुपमध्ये सामील होऊन ते पथनाट्य आणि नाटके सादर करायचे. तिथून अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली.
3 / 7
विजयला आयुष्यात एकचध्येय होते ते म्हणजे फक्त एक प्रसिद्ध कलाकार बनून थिएटरमधून पैसे कमवायचे . यासाठी त्यांनी सुमारे 10 वर्षे केवळ रंगभूमीच केली.
4 / 7
महाविद्यालयीन शिक्षणानानंतर विजय राज यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (NSD) परीक्षा दिली, ज्यामध्ये त्यांची निवड झाली. एकदा विजय राज एनएसडीमध्ये नाटक करत होते. यादरम्यान नसीरुद्दीन शाह यांची नजर विजय राज यांच्यावर पडली. त्याने विजयला मुंबईला बोलावले.
5 / 7
मुंबईमध्ये काही काळ स्ट्रगल केल्यानंतर 2004 मध्ये 'रन' हा चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली. आणि हाच विजयच्या चित्रपटातील करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटात विजय राजने गणेशच्या भूमिकेत आपल्या विचित्र वागण्यामुळे प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.
6 / 7
'रन' नंतर विजय राज यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. यानंतर धमाल, डेढ इश्किया, वेलकम आणि गंगूबाई काठियावाडी यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या.
7 / 7
अभिनयासोबतच विजय राज त्याच्या कॉमेडी व्यतिरिक्त त्याच्या दमदार आवाजासाठी देखील ओळखले जातात. त्यांचा आवाज अनेक चित्रपटांमध्ये निवेदक म्हणून ऐकायला मिळेल.