Marathi News Photo gallery From rakul preet, kriti kharbanda, sonaskhi sinha to aditi rao hydari these celebrities got married this year
Year Ender 2024 : रब ने बना दी जोडी.. यंदा हे सेलिब्रिटी अडकले लग्नबंधनात !
2024 हे वर्ष आता सरत आलंय, अवघ्या काही दिवसांतच नवीन वर्ष सुरू होईल. या वर्षात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकले. तर अनेक जणांना नव्या पाहुण्याचे घरात स्वागत केले. सोनाक्षी सिन्हा , अदिती राव हैदरी पासून ते सोभिता धुलीपाला पर्यंत अनेकांनी यावर्षी विवाह केला. टाकूया एक नजर ( Photos:Social Media)
1 / 6
अभिनेत्री रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी 21 फेब्रुवारी 2024मध्ये गोव्यात इंटिमेट सोहळ्यात लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी ते बराच काळ एकमेकांना डेट करत होते.
2 / 6
बॉलीवूडचे लाडके कपल, क्रिती खरबंदा आणि पुलकित सम्राट हे १५ मार्चला लग्नबंधनात अडकले. ऑन-स्क्रीन केमिस्ट्री आणि ऑफ-स्क्रीन रोमान्ससाठी ओळखले जाणारे हे जोडपे लग्नात खूप स्पेशल दिसत होते, त्यांचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता.
3 / 6
गेल्या अनेक वर्षांपासून डेट करणाऱ्या मात्र नात्याबद्दल कधीच उघडपणे न बोलणाऱ्या अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांचा जून महिन्यात विवाह झाला. घरचे व मित्र-मैत्रिणी यांच्या उपस्थितीत त्यांनी रजिस्टर मॅरेज केलं.
4 / 6
या वर्षातलं सगळ्यात गाजलेलं , मोठं लग्न म्हणजे उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा. मार्च महिन्यापासून त्यांच्या लग्नाच्या वेगवेगळ्या सोहळ्यांना सुरूवात झाली. जामनगरमध्ये मोठा सोहळाही झाला. त्यानंतर जुलै महिन्या अनेक दिवस झालेल्या सेलिब्रेशनननंतर 12 जुलै रोजी त्यांचा थाटामाटात विवाह झाला. या लग्नासाठी फक्त देशातलेच सेलिब्रिटी, राजकारणी नव्हे तर जगभरातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. पंतप्रधान मोदींनीही उपस्थित राहून वधूवरांना आशीर्वाद दिले.
5 / 6
हीरामंडी फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी आणि सिद्धार्थ यांनी सप्टेंबर महिन्यात गुपचुप लग्न केलं. 16 सप्टेंबर रोजी तेलंगणातील 400 वर्ष जुन्या मंदिरात त्यांनी लग्न केले, या विवाहाची कोणालाच कानोकान खबर नव्हती. मात्र त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्या दोघांनी पुन्हा लग्न केलं. त्यांच्या लग्नाचे फोटो वेगाने व्हायरल झाले. अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
6 / 6
साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलीपाला यांचं 4 डिसेंबरला लग्न पार पडलं. काही महिन्यांपर्वी त्यांचा साखपुडा झाला होता. तेव्हापासूनच त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये त्या दोघांनी कुटुंबियांच्या उपस्थितीत थाटामाटात विवाह केला.