राजकुमार रावपूर्वी या स्टार्सनी मोठ्या पडद्यावर साकारली अंध व्यक्तीची भूमिका, कोणी केली सर्वाधिक कमाई

| Updated on: Apr 11, 2024 | 2:17 PM

खणखणीत अभिनयासाठी नावाजला जाणारा अभिनेता राजकुमार सध्या 'श्रीकांत' चित्रपटामुळे चर्चेत आहे. ज्यामध्ये त्याने पहिल्यांदाच अंध व्यक्तीची भूमिका साकारली आहे. पण त्याच्यापूर्वी अनेक कलाकारांनी मोठ्या पडद्यावर अंध व्यक्तीची भूमिका केली आहे.

1 / 6
राजकुमार रावचा 'श्रीकांत' चित्रपट हा प्रसिद्ध उद्योगपती श्रीकांत बोला यांचा बायोपिक आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री ज्योतिकाही मुख्य भूमिकेत आहे.

2 / 6
राणी मुखर्जी - सर्वप्रथम बॉलिवूडची क्वीन म्हणजेच राणी मुखर्जीबद्दल बोलूया. 'ब्लॅक' चित्रपटात अभिनेत्रीने एका अंध मुलीची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी गौरवलेल्या आणि प्रचंड हिट ठरलेल्या या चित्रपटाने सुमारे 66.6 कोटींची कमाई केली होती.

3 / 6
संजय दत्त - या यादीत बॉलीवूडचा खलनायक,  संजय दत्तचेही नाव आहे. या अभिनेत्याने 1998 मध्ये आलेल्या 'दुष्मन' चित्रपटात अंध व्यक्तीची भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याच्यासोबत काजोल आणि आशुतोष राणाही होते. त्या काळात चित्रपटाने 10.16 कोटींची कमाई केली होती.

4 / 6
दीपिका पदुकोण - दीपिका पदुकोण 'लफंगे परिंदे' या चित्रपटात अंध मुलीच्या भूमिकेत दिसली होती. या चित्रपटाने 22 कोटींची कमाई केली होती.

5 / 6
काजोल - या यादीत नामवंत अभिनेत्री काजोलचेही नाव आहे. ती 'फना' चित्रपटात एका अंध मुलीच्या भूमिकेत दिसली होती. यामध्ये आमिर खानही प्रमुख भूमिकेत होता.  हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि त्याने 103 कोटींचा व्यवसाय केला.

6 / 6