इस प्यार को मैं क्या नाम दू ? या 10 स्टार्सनी निवडला दुसऱ्या धर्मातील जीवनसाथी !
बॉलिवूडमध्ये अशी अनेक जोडपी आहेत, ज्यांनी परधर्मात लग्न केलं आहे. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाचं तर ताजं उदाहरण आहे, मात्र त्यांच्याव्यतिरिक्त अशी अनेक जोडपी हेत, ज्यांनी दुसऱ्या धर्मातील जोडीदार निवडून लग्न केलं. ( photos - Social Media)
1 / 10
सुनील दत्त – नर्गिस या यादीत पहिले नाव येते ते बॉलिवूडचं प्रसिद्ध जोडपं सुनील दत्त आणि नर्गिस यांचे. या दोघांची भेट मदर इंडिया चित्रपटाच्या सेटवर झाली.विशेष म्हणजे नर्गिस यांनी त्या चित्रपटात सुनील दत्तच्या आईची भूमिका साकारली होती. दोघेही चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले आणि काही काळानंतर त्यांनी लग्न केले.
2 / 10
शाहरुख खान – गौरी शाहरुख खान आणि गौरीची लव्हस्टोरी सर्वांनाच माहिती आहे. दोघेही कॉलेजच्या दिवसांपासून एकमेकांसोबत आहेत. मात्र, वेगवेगळ्या धर्मांमुळे त्यांच्या लग्नात अनेक अडचणी आल्या. गौरी पंजाबी हिंदू कुटुंबातील असून सुरूवातील तिच्या घरच्यांना हे लग्न मान्य नव्हतं, मात्र अखेर ते राजी झाले. त्यानंतर शाहरुख-गौरीचं लग्न झालं.
3 / 10
दीया मिर्झा – वैभव रेखी 2021 मध्ये दिया मिर्झाने हिंदू रितीरिवाजानुसार बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केले आणि ती सेटल झाली. याआधीही दियाने 2014 मध्ये निर्माता साहिल संघासोबत लग्न केले होते, पण त्यांचे नाते फार काळ टिकलं नाही. 2019 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला.
4 / 10
सैफ अली खान – करीना कपूर अभिनेता सैफ अली खानने दोनदा लग्न केले असून त्याच्या दोन्ही पत्नी हिंदू आहेत. सैफचे पहिले लग्न अमृता सिंगसोबत झाले होते, मात्र नंतर त्याचं नातं संपुष्टात आलं. काही वर्षांनी सैफ करीना एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी विवाह केला.
5 / 10
मनोज वाजपेयी – नेहा मनोज बाजपेयी यांचं नाव अव्वल अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. मात्र त्यांनी एका मुस्लिम लग्नही केले आहे. अभिनेत्री नेहा हिचं खरं नाव शबाना रझा आहे. दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केले, त्यानंतर 1998 मध्ये दोघ विवाहबद्ध झाले.
6 / 10
इरफान खान – सुतापा इरफान खान आता या जगात नसला तरी बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी त्याची ओळख आहे. त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या प्रेमकथेचीही खूप चर्चा झाली. इरफानने सुतापाशी लग्न केले, दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये भेटले होते.
7 / 10
सोहा अली खान – कुणाल खेमू अभिनेत्री सोहा अली खाननेही दुसऱ्या धर्मातील तरूणाशी लग्न केलं. 2015 साली ती आणि कुणाल खेमू विवाहबद्ध झाले. कुणाल हा काश्मिरी पंडीत आहेत. सुरूवातीला दोघे चांगले मित्र होते, नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले.
8 / 10
इमरान खान – अवंतिका बराच काळ एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता इम्रान खान आणि अवंतिका यांनी लग्न केले. दोघेही 19 वर्षांचे असताना त्यांच्या नात्याला सुरुवात झाली. दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. त्यांना एक मुलगी आहे. मात्र आता ते वेगळे झालेत.
9 / 10
संजय दत्त – मान्यता संजय दत्त आणि मान्यता यांची जोडीदेखील प्रसिद्ध आहे. पण मान्यता ही मुस्लिम आहे, हे तुम्हाला माहीत आहे का ? तिचं खरं नाव दिलनवाज शेख आहे, 2008 मध्ये ती संजयसोबत विवाहबद्ध झाली.
10 / 10
सुनील शेट्टी – माना कादरी सुनील शेट्टीच्या लव्हस्टोरीबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. त्याने 1991 मध्ये मुस्लिम कुटुंबातील माना कादरीशी लग्न केले.