‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर प्रेग्नेंट आहे.
धनश्री नेहमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. ती चाहत्यांशी कनेक्ट होण्यासाठी रोज नवनवीन पोस्ट शेअर करत असते.
आता गेले काही दिवस धनश्री पुण्यात धमाल करतेय. भटकंती करण्यासाठी ती आता पुण्यातील एका रिसॉर्टमध्ये पोहोचली आहे.
या रिसॉर्टमधील काही फोटो धनश्रीनं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये धनश्री कलरफुल अंदाजात दिसत आहे. तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस आला आहे.