Marathi News Photo gallery Gas cylinder price increase, this change in GST rules, know what has happened concerning FASTag
बदलला महिना, पैशांसंबंधीच्या नियमातही बदल झाला, नुकसान होण्यापूर्वी जाणून घ्या
Month Rule Change | महिना बदलला. मार्च महिना आला. आता आर्थिक धोरणांशी संबंधीत अनेक नियम बदलले आहेत. गॅस सिलेंडरच्या किंमती वाढल्या आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत वाढली आहे. जीएसटी नियमात बदल झाला आहे. इतर अनेक बदलांचा थेट तुमच्या खिशावर परिणाम होईल.
Follow us on
मार्च महिन्याची सुरुवात झाली आहे. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला कोणता ना कोणता बदल होत असतो. गॅस सिलेंडरची किंमत वधारली आहे. जीएसटी नियमात बदल झाला आहे. तर FASTag शी संबंधित नियमात बदल झाला आहे. नागरिकांना 1 मार्च 2024 पासून अनेक बदलांना सामोरे जावे लागणार आहे. त्याचा ग्राहकांच्या खिशावर ताण पडणार आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच पेट्रोलियम कंपन्यांनी ग्राहकांना फटका दिला. देशात एलपीजी सिलेंडरच्या भावात वाढ झाली. गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे बजेट वाढणार आहे. ऑईल कंपन्यांनीन आजपासून ही दरवाढ लागू केली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत ही वाढ झाली आहे. दिल्लीत कर्मशियल गॅस सिलेंडरची किंमत 25 रुपये, तर मुंबईत ही किंमत 26 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हॉटेलिंग महागणार आहे. पार्ट्यांसाठी आता कदाचित अधिक दाम मोजावे लागतील.
तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी विमानासाठीच्या इंधनाचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला. ATF च्या किंमतीत 624.37 रुपये प्रति किलोलीटर वाढीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दिल्लीत हा भाव 1,01,396.54 रुपये किलो लिटर, तर कोलकत्यात 1,10,296.83 रुपये, मुंबईत हा भाव 94,809.22 रुपये झाला आहे. चेन्नईत 1,05,398.63 रुपये किलो लिटर भाव पोहचला.
हे सुद्धा वाचा
आज 1 मार्चपासून जीएसटी नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. आता 5 कोटी रुपयांहून अधिकच्या व्यवहाराशी संबंधित ई-चालानचे ई-वे बिल तयार होणार नाही.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने NHAI, नागरिकांना मोठा दिलासा दिला. प्राधिकरणाने One Vehicle, One FASTag ची डेडलाईन वाढवली आहे. ही अंतिम मुदत 29 फेब्रुवारी रोजी संपणार होती. आता ती वाढवून 31 मार्च 2024 रोजीपर्यंत करण्यात आली आहे.