‘माझा होशील ना’ मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे सध्या नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट होतेय.
नुकतंच पार पडलेल्या ‘झी मराठी’ पुरस्कार सोहळ्यात गौतमीनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मान आपल्या नावावर केला.
आता गौतमीनं शेअर केलेले हे फोटो सर्वांचं मन जिंकून घेत आहेत.
याशिवाय गौतमी एक उत्तम गायिका आहे. मात्र ती सध्या आपल्या अभिनयाची सुंदर छाप प्रेक्षकांच्या मनावर पाडतेय.
महत्त्वाचं म्हणजे घरातच तिने हे फोटोशूट केलं आहे.