मध्य-पूर्वेतील युद्ध आणि त्यापूर्वी युक्रेन-रशियाच्या युद्ध काळात अनेक देशांच्या केंद्रीय बँकांनी भरभरून सोन्याची खरेदी केली. कोणत्या देशाकडे किती सोन्याचा साठा आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? कोणता देश आहे अव्वल...
वर्ल्ड गोल्ड काऊंसिलच्या आकडेवारीनुसार, अमेरिका या देशाकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. अमेरिकेकडे 8133.46 टन सोने आहे.
ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.
तिसऱ्या क्रमांकावर इटली आहे. आकडेवारीनुसार, इटलीकडे 2451.84 टन सोन्याचा साठा आहे. यंदा या साठ्यात कोणताही बदल झालेला नाही.
या यादीत चौथ्या क्रमांकावर फ्रान्स हा देश आहे. त्याच्याकडे 2436.94 टन सोने आहे तर आपला शेजारी चीन हा पाचव्या क्रमांकावर आहे. चीनकडे 2264.32 टन सोने आहे.
मग भरताचा क्रमांका कितवा आहे? तर या यादीत भारताचा क्रमांक सातवा आहे. भारताकडे 853.63 टन सोने आहे. तर सहाव्या स्थानावर 1039.94 टन सोन्यासह स्वित्झर्लंड हा देश आहे.