जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीत तुफान; ग्राहकांच्या खिशावर संक्रांत

| Updated on: Jan 14, 2025 | 12:10 PM

Jalgaon Gold And Silver Price Today : मकर संक्रांतीला सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली. जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीत तुफान आले. ग्राहकांच्या खिशावर यामुळे संक्रांत आली आहे.

1 / 6
जळगाव येथील सराफा बाजारात सोने आणि चांदीचा महागाईचा पतंग आकाशी गेला आहे. मकर संक्रांतीला मौल्यवान धातुची खरेदी महागली आहे. ग्राहकांच्या खिशावर संक्रांत आली आहे.

2 / 6
जळगावच्या सराफ बाजारात आठवडाभरात सोने प्रतितोळा ११०० तर चांदी २ हजार रुपयांनी महागली. आज ग्राहकांना सोने-चांदी खरेदीसाठी अधिक दर मोजावा लागेल.

3 / 6
सध्या स्थितीत सोने जीएसटीसह ८१,१६४ रुपये तर चांदी ९२ हजार रुपयांवर पोहोचली आहे. ग्राहक राजाला हा नवीन दर ऐकून घाम फुटला आहे.

4 / 6
नववर्षाच्या सुरुवातीला सोने ७६,५०० रुपये प्रतितोळा तर चांदी ८८ हजार रुपये किलो होती. म्हणजे अवघ्या दोन आठवड्यात सोने पाच हजारांच्या घरात तर चांदी चार हजारांच्या जवळपास महागली आहे.

5 / 6
नवा विषाणू आणि शेअर बाजारातील मोठी घसरण याचा सोन्या-चांदी दरावर परिणाम होत असल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

6 / 6
 ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.