गेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीने महागाईची धुळवड खेळली आहे. दोन्ही धातुत मोठी उसळी आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दोन्ही धातुनी ग्राहकांच्या जीवाला घोर लावला आहे.
जळगावच्या सराफा बाजारात सुद्धा सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. दोन्ही धातुमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता जीएसटीसह सराफा मार्केटमध्ये अशा आहेत किंमती
सोने ८८ हजार ४०० रुपये प्रतितोळा तर चांदी एक लाख ७०० रुपये प्रति किलोवर पोहचली आहे. काल सोन्याचे दर ९० हजार ६०० तर चांदीचे दर १ लाख ४ हजार रुपये इतके होते.
सोन्याचा भाव जीएसटीसह ९१,०५२ रुपयांवर पोहचला आहे. तर चांदी जीएसटीसह १,०३,७२१ रुपयांवर आहे. सोन्याचा मूळ भाव ८८,४०० रुपये प्रति तोळा, तर एक किलो चांदीची मूळ किंमत १,००,७०० रुपये आहे.
दोन्ही धातु गेल्या पाच महिन्यांपासून उच्चांक गाठत आहे. अमेरिकेत ट्रम्प सरकार आल्यापासून सोने आणि चांदी सुसाट धावत आहेत. जानेवारी ते मार्च या दरम्यान सोने जवळपास १६ हजारांनी वाढले आहे.
येत्या काळात दोन्ही धातुत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते.