Government Job : सर्वाधिक पगार असणारी सरकारी पदं! जाणून घ्या कोणाला किती वेतन मिळतो ते
सरकारी नोकरी मिळवणे वाटते तितकं सोपं नसतं. परीक्षेसोबत तीव्र स्पर्धेला सामोरं जावं लागतं. एका एका पदासाठी लाखो अर्ज येत असतात. त्यातून योग्य आणि पात्र उमेदवाराची निवड केली जाते.पण तुम्हाला माहिती आहे का? कोणत्या पदाला जास्त पगार मिळतो ते..
1 / 6
भारतात अनेक तरुण सरकारी नोकरीचं स्वप्न उराशी बाळगून तयारी करत असतात. जर तुम्हीही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. देशातील सर्वाधिक पगार घेणारी पदं माहिती करून घ्या. जेणेकरून तुम्हाला तुमचं आर्थिक स्वप्न पूर्ण करण्यास मदत होईल.
2 / 6
IAS : भारतात सर्वाधिक पगार हा आयएएस अधिकाऱ्यांना मिळतो. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना बेसिक सॅलरी 56,100 रुपये इतकी असते. त्याचबरोबर इतर सरकारी भत्त्यांचा लाभ मिळतो. या पदासाठी सर्वाधिक पगार हा 2,50,000 रुपयांपर्यंत असतो. त्यामुळेच यूपीएसची सिव्हिल सर्व्हिस परीक्षा देशातील कठीण परीक्षा म्हणून गणली जाते.
3 / 6
IFS : भारतीय विदेश सेवा म्हणजेच आयएफएससाठी निवड झालेल्या उमेदवारांना आयएएस अधिकाऱ्यांप्रमाणे पगार असतो. या उमेदवारांची बेसिक सॅलरी 56,100 रुपयांपासून सुरु होते. यासोबत प्रवास, आरोग्य, निवासस्थान या सारखे भत्ते मिळतात. हे पद आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचं प्रतिनिधीत्व आणि सादरीकरण करण्यासाठी असतं.
4 / 6
IPS : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिस परीक्षेनंतर निवडलेल्या उमेदवारांची आयपीएस ऑफिसर म्हणून निवड केली जाते. या पदावर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला बेसिक सॅलरी 56,100 रुपयांपासून सुरु होते. आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रत्येक महिन्याला 1,31,000 इतका पगार मिळतो.
5 / 6
RBI Grade B : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ग्रेड बी हे पद सर्वाधिक पगार घेणारं आहे. या पदासाठी पगार बेसिक 67,000 रुपयांपासून सुरु होते. तसेच सरकारी भत्ते आणि इतर लाभ मिळतात. या पदावर निवड झालेले उमेदवार पुढे जाऊन देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बनू शकतात.
6 / 6
Judge : भारतात न्यायाधीशांवर मोठी जबाबदारी असते. या पदावर काम करणाऱ्या न्यायाधीशांना चांगला पगार असतो. हायकोर्ट जज प्रत्येक महिन्याला 2,25,00 रुपये सॅलरी घेतात. सुप्रीम कोर्टाच्या जजची सॅलरी 2.50 लाख रुपये असते आणि इतर सरकारी भत्त्याचा लाभ मिळतो.