गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडचा हीरो नंबर वन गोविंदा भलेही रुपेरी पडद्यापासून लांब असला तरी खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहिला आहे. आता अभिनेत्याविषयी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. त्याचे मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे म्हटले जात आहे
गोविंदाचे नाव हे बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांच्या यादीमध्ये घेतले जाते. त्याने ८० ते ९०च्या दशकात सिनेमांवर राज्य केले आहे. अभिनयासोबतच गोविंदाच्या डान्सचे लाखो चाहते होते.
आता गोविंदा खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. रेडिटवरील एका पोस्टनुसार, गोविंदा लग्नाच्या ३७ वर्षांनंतर घटस्फोट घेत आहे.
गोविंदाची पत्नी सुनीता अहूजाने काही मुलाखतीमध्ये याबाबत हिंट दिली होती. ते दोघेही गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळे राहात असल्याचे तिने सांगितले होते.
तसेच गोविंदाचे एका मराठी अभिनेत्रीसोबत अफेअर असल्याचे म्हटले जात आहे. ही अभिनेत्री ३० वर्षांची आहे. दोघांच्या वयामध्ये जवळपास ३१ वर्षांचे अंतर आहे. पण या अभिनेत्रीचे नाव अद्याप समोर आलेले नाही.