केसगळती रोखतात, त्वचेसाठीही ठरतात लाभदायक; द्राक्षं खाण्याचे आहेत हे फायदे
द्राक्षे आपला आहार संतुलित ठेवण्यास आणि शरीराची दैनंदिन कार्ये व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. द्राक्षे केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर केसांसाठी आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहेत.
1 / 5
द्राक्षं खायला बहुतांश लोकांना आवडते. मधुर चवीच्या या फळाचे सेवन केल्याने अनेक फायदेही मिळतात. द्राक्षांमध्ये अनेक आवश्यक पोषक घटक असतात. या फळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही भरपूर असतात. द्राक्षे आपला आहार संतुलित ठेवण्यास आणि शरीराची दैनंदिन कार्ये व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात.
2 / 5
द्राक्षामध्ये सोडिअम, पोटॅशिअम, कॅल्शिअम, आयर्न (लोह), झिंक आणि फॉस्फोरस यांसारखी पोषक घक अतिशय मुबलक प्रमाणात असतात. K, C, B9 यांसारख्या जीवनसत्त्वांचा खजिना असलेली द्राक्षं ही पूर्णपणे कोलेस्ट्रॉल मुक्त आहेत.
3 / 5
द्राक्षांमध्ये शक्तिशाली अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. त्यांना पॉलीफेनोल्स असे म्हटले जाते. पॉलीफेन्लसमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म देखील असतात. हे आपल्या त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते आणि त्वचेचा टोन सुधारण्यास मदत करते.
4 / 5
त्याशिवाय गळणाऱ्या केसांसाठीही द्राक्षे खूप फायदेशीर आहेत. हे केसांना चमक आणते तसेच केसांचा व्हॉल्यूमही वाढवते.
5 / 5
द्राक्षे