Photos : ‘कुणी गुदमरतंय म्हणून मास्क खिशात घालतंय, तर कोण कॅमेरा पाहून मास्क घेतंय’, सोलापुरात हे काय चाललंय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मास्क वापरा अन्यथा लॉकडाऊन अटळ असल्याचा इशारा दिला. त्यांच्या या इशाऱ्याला लोक किती गांभीर्याने घेतात याची पडताळणी करण्यासाठी टीव्ही 9 मराठीच्या टीमने सोलापुरातल्या विविध भागात जाऊन वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
-

टीव्ही 9 मराठीची टीम सोलापुरातल्या नवीपेठ परिसरात गेली. तेथे काहीजण गुदमरतंय म्हणून मास्क खिशात घालून फिरत असल्याचं समोर आलं, तर एकाने कॅमेरा पाहताच मास्क विकत घेतला.
-
-
नवी पेठ परिसरात सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने कारवाईचे सत्र सुरूच आहे. असं असताना अद्याप 10 टक्के लोकही मास्क वापरत नसल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
-
-
यानंतर टीव्ही 9 मराठीची टीम कायम गजबजलेले ठिकाण असलेल्या बसस्थानक परिसरात पोहचली. तेथे अतिशय विदारक चित्र पाहायला मिळालं. बस्थानक प्रमुखच त्यांच्या दालनात मास्क वापरत नसल्याचं आढळून आलं. इतकंच काय त्यांच्या समोर बसलेले लोकही मास्क वापरत नसल्याचं दिसलं.
-
-
बस स्थानकात बसची वाट बघत बसलेल्या महिला मास्क वापरत नसल्याचं आढळलं. त्यांना विचारणा केली असता त्यांनीही वरवरची उत्तरं दिली. विशेष म्हणजे बस चालकच मास्क वापरत नसल्याचंही समोर आलं. बसस्थानकात वावरणाऱ्या काही लोकांनी तर चक्क लुंगीलाच मास्क बनवलं.