बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने सरकत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
बिपरजॉय चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता 74 हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. तर NDRF ची 33 पथकंही तैनात करण्यात आली आहेत.
गुजरातच्या जुनागढ जिल्ह्यातील मंगरोळमध्ये बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम जाणवायला लागला आहे. समुद्राचं पाणी किनाऱ्यावर असलेल्या घरांमध्ये शिरल्याचं पाहायला मिळत आहे.
'बिपरजॉय' चक्रीवादळ आज संध्याकाळी चारनंतर गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील धडकणार आहे. याचसोबत कच्छ, सौराष्ट्र क्षेत्र, मांडवी तट आणि पाकिस्तानमधील कराची बंदराला हे चक्रीवादळ धडकणार आहे.
बिपरजॉय हे चक्रीवादळ आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक काळ टिकलेलं चक्रीवादळ आहे. बिपरजॉयचं स्वरुप तीव्र असल्याने अधिक नुकसानीची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे