गुरूपोर्णिमा उत्सवानिमित्त साईदर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.
शिर्डीत आज मोठ्या भक्तिमय वातावरणात गुरूपोर्णीमा उत्सव साजरा केला जातं आहे.
साईबाबांना गुरूस्थानी मानणारे हजारो भक्त शिर्डीत दाखल होत असून तीन दिवस चालणा-या उत्सवाला कालपासून सुरूवात झाली आहे.
आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून राज्यभरातून साईभक्त शिर्डीत दाखल होत आहे.
आज पहाटे साईबाबांच्या काकड आरतीनंतर पादूकांची मिरवणूक काढण्यात आली आणि उत्सवाच्या मुख्य दिवसाला सुरूवात झाली.
आज दिवसभर भाविकांची शिर्डीत मांदियाळी दिसणार असून साईमंदिर रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे.