बॉलीवूडमध्ये आपले करिअर करण्याच्या इच्छेने दररोज हजारो लोक येतात.अनेकजण आपले करिअर घडवतात. अशाच अनेकांपैकी एक म्हणजे मिथुन चक्रवर्ती होय सुमारे 40 वर्षांपूर्वी मिथुन ही डोळ्यात सुपरस्टार बनण्याचे स्वप्न घेऊन मायानगरीत आला होता.
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने , डान्सने प्रसिद्धी मिळवणारा मिथुन चक्रवर्ती आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहे.
मिथुन चक्रवर्ती जेव्हा चित्रपटात मोठा हिरो बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून मायानगरीत पोहोचले होते, तेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट होती. सुरवातीच्या काळात त्याच्याकडं राहण्यासाठी घर नव्हते,एवढंच काय झोपायला जागा नसल्याने ते कधी बागेत तर कधी हॉस्टेलच्या बाहेर झोपायचे, असे अनेकवेळा घडले होते.
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले होते की त्याच्या मित्राने अभिनेत्याला जिमखाना क्लबची मेंबरशिप दिली होती. जेणेकरून तो सकाळी उठून तेथील बाथरूम वापरू शकेल. फ्रेश होऊन कामाच्या शोधात दिवसभर भटकायचा. याकाळात दररोज दोन वेळेचे जेवण मिळेल की नाही देखील माहीत नसायचे असे ते म्हणाले होते .
अत्यंत हलाकीच्या परिस्थिती जीवन जगत असताना मिथुन चक्रवर्ती यांच्या मनात आत्महत्या करण्याचा विचारही येऊ लागला. पण स्वतःला एक संधी द्याचे ठरून बॉलिवूडचे स्वप्न पाहणे कधीच सोडले नाही. तसेच कायम वास्तवाचा सामना केला.
मिथुन चक्रवर्तीना 1975 ते 76 या काळात त्यांना त्यांच्या स्किनटोनमुळे अनेक नकारांना सामोरे जावे लागले. मग मिथुन दाने विचार केला की तो चांगला डान्स करू शकतात. अन त्यांनी चांगल्या डान्स व मार्शल आर्ट्सवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
मिथुनच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट 1976 साली आला जेव्हा मृणाल सेनने त्याला 'मृगया' चित्रपटात ब्रेक दिला. यात मिथुनची भूमिका आदिवासी नायकाची होती, ज्यामध्ये तो अगदी चपखल बसला होता. या चित्रपटासाठी मिथुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
यानंतर त्यांनी छोट्या-मोठ्या सर्व प्रकारच्या चित्रपटांमध्ये धमाल केलीला. त्यांनी 350 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले
मिथुनच्या कारकिर्दीतील काही सर्वोत्तम चित्रपट म्हणजे डिस्को डान्सर, अग्निपथ, हँगमन, कमांडो, गुरू, पासंद अपनी अपनी, घर एक मंदिर, स्वर्ग से सुंदर. आदी आहे.