अभिनेता सनी देओल यांना दोन बहिणी आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्या हेमा मालिनी यांच्या मुली आहेत, हेही सर्वांना माहीत आहे. मात्र त्यांना आणखी दोन बहिणी आहेत हे खूप कमी लोकांना हे माहिती आहे. धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर यांच्यापासून झालेल्या या दोन्ही मुली आहेत. त्या दोघींचं नाव अजेता आणि विजेता आहे.
दमदार अभिनयानं सर्वांचं मन जिंकणारे सनी देओल आज म्हणजेच 19 ऑक्टोबरला आपला 64वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांचा जन्म 19 ऑक्टोबर 1956 ला पंजाबमध्ये झाला होता.
सनी देओल यांच्या संपत्ती विषयी जाणून घ्यायचं असेल तर ते जवळजवळ 365 कोटींच्या प्रॉपर्टीचे मालक आहेत. तर ते एका चित्रपटासाठी 7-8 कोटी रुपये मानधन घेतात.
या व्यतिरिक्त सनी देओल यांचं स्वत:चं एक प्रोडक्शन हाऊस आहे. ज्याचं नाव आहे विजेता फिल्मस्.
सनी देओल यांचा मुंबईतील जुहूमध्ये स्वत:चा एक बंगला आहे. तर यूकेतसुद्धा एक घर आहे.
या व्यतिरिक्त त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत. ज्यात पोर्शे, ऑडी ए8 आणि रेंज रोवरसारख्या गाड्यांचा समावेश आहे.
सिनेमातच नाही तर सनी देओल आता राजकारणातही सक्रिय आहेत, लोकसभेत भारतीय जनता पक्षाकडून पंजाबच्या गुरुदासपूर या मतदारसंघातून यांनी निवडणुक लढवली आणि चांगली फॅन फॉलोइंग असल्यानं ते जिंकले.